नाशिकला शीतसाखळी टर्मिनल मार्केट
By admin | Published: December 28, 2015 03:56 AM2015-12-28T03:56:22+5:302015-12-28T03:56:22+5:30
केंद्र शासनाने देशात टर्मिनल मार्केट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, राज्यात मुंबई, नाशिक व नागपूर येथे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती
नाशिक : केंद्र शासनाने देशात टर्मिनल मार्केट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, राज्यात मुंबई, नाशिक व नागपूर येथे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली. राज्य अथवा केंद्रीय फलोत्पादन अभियानातून उत्तर महाराष्ट्रात सात शीतसाखळी टर्मिनल मार्केट उभारण्याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाने फळे, भाजीपाला व इतर नाशवंत शेतमालाकरिता टर्मिनल मार्केटच्या उभारणीसाठी निविदाप्रक्रिया व खासगी उद्योजकांची निवड करण्यासंदर्भात एक समिती गठीत केली. त्या धर्तीवर राज्य शासनानेही अशी समिती गठीत करून कृषी पणन मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करून त्यांनी त्या समितीच्या मार्गदर्शनाखाली टर्मिनल मार्केटचे काम करावयाचे आहे.
त्याचप्रमाणे फळे व भाजीपाल्याकरिता स्वतंत्र शीतसाखळी स्थापन करण्यात आलेली असून, नाशिक विभागातील नाशवंत फळांकरिता व भाजीपाल्यांकरिता वातानुकूलित वाहने, प्रिकुलिंग कोल्ड स्टोअरेज, रायपनिंग चेंबर आदींचा आवश्यकतेप्रमाणे समावेश असलेल्या सात शीतसाखळ्या स्थापन करण्यात येणार आहेत. शेतकरी फॉर्म
पॅक हाउसला माल आणतील व त्यावर प्राथमिक प्रक्रिया व पॅकिंग करून वातानुकूलित वाहनाने माल समूह केंद्रात आणला जाईल. त्यानंतर तो ग्रेडिंग-पॅकिंग करून प्रिकुलिंग, कोल्ड स्टोअरेजला ठेवला जाईल व नंतर निर्यात केला जाईल, असे गोडसे यांनी सांगितले.
प्रकल्पाकरिता सिद्धपिंप्री येथील १०० एकर जमिनीचा प्रस्ताव शसनाकडे २०१०मध्ये पाठविला होता. तो प्रलंबित होता. गोडसे
यांनी मौजे वापगाव (ठाणे) व
मौजे वारंगा (नागपूर) येथील धर्तीवर ही जागा विनामूल्य उपलब्ध
करून देण्याबाबत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे मागणी केली आहे. (प्रतिनिधी)