राज्यात पुन्हा हुडहुडी; मुंबईकर मात्र घामाघूम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 05:58 AM2024-01-14T05:58:27+5:302024-01-14T05:58:54+5:30
दक्षिण भारतातील हिवाळी पावसाचा हंगाम १५ जानेवारीला आटोपण्याची शक्यता आहे.
मुंबई/जळगाव : संक्रांतीनंतरच्या आठवड्यात राज्यभरातील किमान तापमानाचा पारा सरासरी १५ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज वर्तविला आहे. तर दुसरीकडे मुंबईत मात्र ऐन थंडीत गरमीचा सामना करावा लागत आहे.
दक्षिण भारतातील हिवाळी पावसाचा हंगाम १५ जानेवारीला आटोपण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्रात थंडीसाठी पूरकता वाढते. राज्यातील ढगाळ वातावरण कमी होणार असून, कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.