राज्यात थंडीचा कडाका कमी होऊ लागला
By admin | Published: January 3, 2017 04:24 AM2017-01-03T04:24:32+5:302017-01-03T04:24:32+5:30
मागील काही दिवसांपासून राज्यातील किमान तापमान वाढत आहे. सोमवारीही किमान तापमान वाढल्याने थंडीची तीव्रता कमी झाली.
पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यातील किमान तापमान वाढत आहे. सोमवारीही किमान तापमान वाढल्याने थंडीची तीव्रता कमी झाली. मागील आठवड्यात सर्वत्र थंडीचा कडाका होता.
सोमवारी विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील तापमानही वाढले आहे. सोमवारी जळगाव येथे सर्वात कमी ९.५ अंश तर त्यानंतर नाशिकमध्ये १० अंश एवढे किमान तापमान नोंदविले गेले.
प्रमुख शहरातील किमान तापमान - मुंबई २०.८, रत्नागिरी १७.९, पुणे ११.१, कोल्हापूर १५.९, महाबळेश्वर १४.२, मालेगाव १२, सांगली १३.४, सातारा १३, सोलापूर १४.२, उस्मानाबाद ११.९, औरंगाबाद १२.४, अकोला १२.५, अमरावती १२.२, चंद्रपुर १६.२, गोंदिया १०.६, नागपूर १३.७, वाशिम १८.२, वर्धा १३.४, यवतमाळ १३.८. (प्रतिनिधी)