राज्यात थंडीची लाट कायम
By Admin | Published: January 25, 2016 02:42 AM2016-01-25T02:42:21+5:302016-01-25T02:42:21+5:30
विदर्भात शनिवारी आलेली तीव्र थंडीची लाट रविवारीही कायम आहे. नागपूर येथे सर्वांत कमी म्हणजे ६.२ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबई : विदर्भात शनिवारी आलेली तीव्र थंडीची लाट रविवारीही कायम आहे. नागपूर येथे सर्वांत कमी म्हणजे ६.२ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढतच आहे. २५ जानेवारी रोजीही (सोमवार) विदर्भात थंडीची लाट कायम राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, तर मराठवाड्याला मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला असून, मुंबईचे किमान तापमान १६ अंशावर कायम राहिले आहे.
मागील २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र थंडीची लाट होती. मराठवाड्याच्या काही भागांत व विदर्भाच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकणाच्या काही भागांत आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. २५ जानेवारी रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २६, २७ आणि २८ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, तर पुढील ४८ तासांसाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, १६ अंशाच्या आसपास राहील.
प्रमुख शहरांचे किमान तापमान अंश
सेल्सिअसमध्ये : जळगाव ७.६, मालेगाव ९, नाशिक ८.५, परभणी १०.५, नांदेड ८, अकोला ९.५, अमरावती ९.६, चंद्रपूर ८.३, गोंदिया ६.९, नागपूर ६.२, वर्धा ९, यवतमाळ १०.४.