राज्यात थंडीची लाट
By admin | Published: December 23, 2016 01:11 AM2016-12-23T01:11:01+5:302016-12-23T01:11:01+5:30
मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांत थंडीची मोठी लाट आली असून, किमान तापमानात मोठी घट झाली आहे. बुधवारच्या
पुणे : मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांत थंडीची मोठी लाट आली असून, किमान तापमानात मोठी घट झाली आहे. बुधवारच्या तुलनेत अनेक ठिकाणी तापमान १ ते २ अंश सेल्सिअसनी घसरले आहे. अहमदनगर येथे राज्यातील सर्वाधिक कमी ५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
पूर्व मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे़ पुण्यासह गोव्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान : पुणे ९़००, जळगाव ८.४, महाबळेश्वर १४.६., मालेगाव १०.४, , सांगली १२.००, सातारा १०.९, अलिबाग १७.६, रत्नागिरी १६.६, सोलापूर १०.९, उस्मानाबाद १०.७, औरंगाबाद १०.७, परभणी १०.७, नांदेड ११.००, अकोला १०़००, अमरावती ९.६, बुलडाणा १२़२, गोंदिया ८.३, नागपूर९़१, वाशिम १६.२ व वर्धा १०.५. (अंश सेल्सिअस)