राज्यातून थंडी गायब
By admin | Published: January 30, 2016 01:50 AM2016-01-30T01:50:14+5:302016-01-30T01:50:14+5:30
देशात निर्माण झालेल्या दोन चक्राकार स्थितींचा परिणाम राज्यातील थंडीवर झाला असून थंडी गायब झाली आहे. बहुतांशी शहरांचे किमान तापमान सरासरीच्या वर गेले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका
पुणे : देशात निर्माण झालेल्या दोन चक्राकार स्थितींचा परिणाम राज्यातील थंडीवर झाला असून थंडी गायब झाली आहे. बहुतांशी शहरांचे किमान तापमान सरासरीच्या वर गेले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कमी होऊन दिवसा काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे.
देशात राजस्थान व मेघालयाच्या परिसरात चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी उत्तरेकडील थंड वारे त्या चक्राकार स्थितीकडे आकृष्ट होतात. परिणामी राज्यात थंडी पडण्यास आवश्यक असणारे थंड वारे राजस्थान व मेघालयाच्या परिसरातच अडवले गेले आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानात
वाढ झाली आहे. कोकण व विदर्भात काही ठिकाणी तापमानातील घट वगळता उर्वरित राज्यातून थंडी गायब झाली आहे. तसेच वेस्टर्न डिस्टर्बन्समुळेही तापमानात वाढ झाली आहे.
राज्यातील हवामान कोरडे असले तरी हवेतील गारवा गायब
झाला आहे. कमाल तापमानातही
१ ते ३ अंशांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. सर्वात कमी तापमान जळगाव येथे ९.४ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले.
२ फेब्रुवारीपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
किमान तापमान
(अंश सेल्सियस)
पुणे १०.९, लोहगाव १३.६, जळगाव ९.४, कोल्हापूर १७.९, महाबळेश्वर १४.६, मालेगाव १३.२, नाशिक १०.६, सांगली १५.१, सातारा १२.९, सोलापूर १७.१, अलिबाग १८.६, रत्नागिरी १६, उस्मानाबाद १५.४, औरंगाबाद १४, परभणी १४, नांदेड १०, अकोला १३.२, अमरावती १६.४, बुलडाणा १६.२, ब्रह्मपुरी १४.८, चंद्रपूर १५, गोंदिया १२.९, नागपूर १४.२, वाशिम १८.२, वर्धा १५.५, यवतमाळ १४.४.