ढगाळ हवामानामुळे राज्यभरातून थंडी पळाली!
By admin | Published: November 15, 2016 05:39 AM2016-11-15T05:39:55+5:302016-11-15T05:36:13+5:30
अरबी समुद्रात लक्ष्यद्वीप ते दक्षिण कोकण दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तरेकडील वाऱ्याचा दाब कमी होऊन राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण
पुणे : अरबी समुद्रात लक्ष्यद्वीप ते दक्षिण कोकण दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तरेकडील वाऱ्याचा दाब कमी होऊन राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली असून अनेक ठिकाणी थंडी कमी झाली आहे़
रविवारच्या तुलनेत सोमवारी राज्यातील प्रमुख शहरातील तापमानात २ ते ३ अंशाने वाढ झाली. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव येथे १२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले.पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान ९़९ अंशापर्यंत खाली गेले होते़ रविवारी त्यात थोडी वाढ होऊन ते १०़९ अंशावर आले़ सोमवारी सकाळी त्यात एकाच दिवसात २़३ अंशाने वाढ होऊन सोमवारी सकाळी ते १३़२ अंश सेल्सिअस नोंदले गेले़ पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३० व १३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे़
प्रमख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १३़२, जळगाव १२़,कोल्हापूर १८़६, महाबळेश्वर १५़४, नाशिक १२़३, सांगली १७़३, सातारा १६, सोलापूर १७़७, मुंबई २३़५, अलिबाग १९़८, रत्नागिरी २०़८, डहाणू १९़१़, उस्मानाबाद १३़३, औरंगाबाद १४़४, अकोला १४, चंद्रपूर १७़, नागपूर १४़६, वाशिम १७़८, वर्धा १४़९, यवतमाळ १२़४़ (प्रतिनिधी)