राज्यात थंडीची चाहूल, सांगली गारठलेली; १५ नोव्हेंबरनंतर तापमानात घट होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 11:00 AM2024-11-08T11:00:00+5:302024-11-08T11:00:13+5:30

Maharashtra News: दिवाळीनंतर थंडीने आता चाहूल द्यायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तापमान काही अंशी घसरले आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी थंडी पडत आहे.

Cold weather in the state, Sangli frozen; After November 15, the temperature will decrease | राज्यात थंडीची चाहूल, सांगली गारठलेली; १५ नोव्हेंबरनंतर तापमानात घट होणार

राज्यात थंडीची चाहूल, सांगली गारठलेली; १५ नोव्हेंबरनंतर तापमानात घट होणार

 पुणे - दिवाळीनंतर थंडीने आता चाहूल द्यायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तापमान काही अंशी घसरले आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी थंडी पडत आहे. गुरुवारी सांगली कमी तापमानाची नोंद झाली. तेथे गुरुवारी तिथे १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अहिल्यानगर येथे त्या खालोखाल १४.७ अंश सेल्सिअस तापमान होते. 

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील तापमानामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी राज्यात थंडी पडली नाही; पण पावसाचे वातावरण होते. दिवाळी संपली आणि पहाटे गारठा आणि दुपारी ऊन अनुभवायला मिळत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील नाशिकमध्ये नीचांकी १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील पाच दिवस राज्यामध्ये कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातील किमान तापमानाची नोंद
    सांगली    १४.४  
    अहिल्यानगर    १४.७ 
    पुणे    १५.२ 
    जळगाव    १५.८ 
    महाबळेश्वर    १५.६ 
    मालेगाव    १७.८ 
    सातारा    १६.६ 
    परभणी    १८.३ 
    नागपूर    १८.६ 

 

Web Title: Cold weather in the state, Sangli frozen; After November 15, the temperature will decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.