राज्यात थंडीचा कडाका वाढणार! ११ नोव्हेंबरपासून किमान तापमान ३ अंशांनी घसरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 08:09 AM2022-11-09T08:09:47+5:302022-11-09T08:10:28+5:30

मुंबईसह महाराष्ट्रात थंडी डेरेदाखल होत असून, आता राज्यभरातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान आणखी घसरू लागले आहे.

cold will increase in the state minimum temperature will drop by 3 degrees from November 11 | राज्यात थंडीचा कडाका वाढणार! ११ नोव्हेंबरपासून किमान तापमान ३ अंशांनी घसरणार

राज्यात थंडीचा कडाका वाढणार! ११ नोव्हेंबरपासून किमान तापमान ३ अंशांनी घसरणार

googlenewsNext

मुंबई:

मुंबईसह महाराष्ट्रात थंडी डेरेदाखल होत असून, आता राज्यभरातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान आणखी घसरू लागले आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील किमान तापमानाने खाली उतरले असले तरी विदर्भात किमान तापमानाचा पारा अजून स्थिर आहे तरी रविवारपर्यंत राज्यात किमान तापमानात ३ अंशाची घसरण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात ढगाळ वातावरण
1.महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात ढगाळ वातावरण आहे; परंतु महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. राज्यात पुढील दोन दिवस पहाटेच्या किमान तापमानात विशेष फरक जाणवणार नसला तरी ११ नोव्हेंबरपासून पुढील ३ दिवस म्हणजे रविवारपर्यंत किमान तापमानात ३ अंशांपर्यंत घसरण होईल. 
2. सध्यापेक्षा थंडी आणखी जाणवेल. विशेषत: खान्देशात थंडीचा प्रभाव अधिक राहील तर दुपारच्या सध्याच्या कमाल तापमानात सरासरी २ अशांच्या फरकामुळे राज्यात दुपारचे तापमान ऊबदार जाणवेल, अशी माहिती हवामान खात्याचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.

Web Title: cold will increase in the state minimum temperature will drop by 3 degrees from November 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.