राज्यात थंडीचा कडाका !
By Admin | Published: January 12, 2017 04:09 AM2017-01-12T04:09:34+5:302017-01-12T04:09:34+5:30
संक्रातीच्या तोंडावर थंडीचा कडाका आणखी वाढला आहे. मुंबईसह मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात
पुणे : संक्रातीच्या तोंडावर थंडीचा कडाका आणखी वाढला आहे. मुंबईसह मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे़ बुधवारी सर्वात निच्चांकी तापमान नाशिक येथे ५.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुण्यातही ७़७ अंश सेल्सिअस असे हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
देशभरात थंडीचा कडाका वाढला असून पश्चिम राजस्थान, हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब येथे थंडीची लाट दिसून येत आहे़ हरियाना, पश्चिम राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला असून पंजाब व राजस्थानात काही ठिकाणी किमान तापमान २ अशांच्या खाली गेले आहे़ उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यालाही चांगलीच हुडहुडी भरली आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ ते ६ अंशांनी घट झाली आहे़ राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ७़७, अहमदनगर ७़१, जळगाव ८,कोल्हापूर १४, महाबळेश्वर १२, मालेगाव ७़४़, नाशिक ५़८, सांगली ११़५, सातारा १०, सोलापूर १०़७, मुंबई १७़४, अलिबाग १५़४, रत्नागिरी १६़३, पणजी १९, डहाणू १४़१, भिरा १३़३, उस्मानाबाद ८़४, औरंगाबाद ७़६, परभणी ९़५, नांदेड १२, बीड १४़४, अकोला ९़५़, अमरावती ९़२, बुलढाणा ९़८, ब्रम्हपुरी १३़२, चंद्रपूर १३़२, गोंदिया १०़८, नागपूर१२़८, वाशिम १२़६, वर्धा ११, यवतमाळ ९़४़ (प्रतिनिधी)
पारा ५ अंशावर
विदर्भातही काही ठिकाणी किमान तापमानात एकाच दिवसात ५ अंशांची घट झाली आहे़ राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचे शहर ठरले आहे. निफाड तालुक्यात तर थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून, पारा ५ अंशावर आल्याची शक्यता आहे.