मालगावचे लाचखोर अपर जिल्हाधिकारी ताब्यात

By admin | Published: August 7, 2015 01:16 AM2015-08-07T01:16:58+5:302015-08-07T01:16:58+5:30

जमीन व्यवहारात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ३५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारे मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र बापूराव

The Collector of Malgaon is in possession of the Additional Collector | मालगावचे लाचखोर अपर जिल्हाधिकारी ताब्यात

मालगावचे लाचखोर अपर जिल्हाधिकारी ताब्यात

Next

नाशिक : जमीन व्यवहारात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ३५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारे मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र बापूराव पवार व त्यांचा खासगी सहकारी दिनेशभाई पंचासरा या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ताब्यात घेतले.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी पवार यांच्या शासकीय कार्यालयाला सील ठोकले, तर सायंकाळी मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या समोर असलेल्या त्यांच्या निवासाचीही झडती
घेऊन तेथून काही कागदपत्रे ताब्यात घेतली. कासारी (ता. नांदगाव) व नाशिक येथील काही नागरिकांनी नांदगाव तालुक्यातील दोन गावांमधील सुमारे ७५ एकर ८५ गुंठे जमीन खरेदी केली होती. परंतु ही जमीन ही नवीन शर्तींची म्हणजेच मूळ मालकाला शासनाने काही अटी, शर्तींवर दिली होती व अशी जमीन हस्तांतरण करताना विभागीय आयुक्तांची अनुमती घेऊन शासनाच्या तिजोरीत नजराणा भरावा लागतो. परंतु मूळ मालकाने व नंतर जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तींनी असा व्यवहार करताना कोणतीही अनुमती घेतली नाही, असे पवार यांचे
म्हणणे होते व त्यापोटी त्यांनी जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तींना मे महिन्यात नोटीस बजावून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पवार यांचा सहकारी दिनेशभाई लालजीभाई पंचासरा याने २७ मे रोजी जमीन मालकांची भेट घेऊन प्रकरण मिटविण्यासाठी पवार यांनी आपल्याला पाठविल्याचे सांगितले व कारवाई टाळायची असेल तर ५० लाखांची मागणी केली होती. मात्र नंतर ३५ लाख रुपयांवर सौदा ठरला.

Web Title: The Collector of Malgaon is in possession of the Additional Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.