सोलापूरच्या जिल्हाधिका-यांनी रांगेतून घेतले विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन
By admin | Published: October 14, 2016 05:13 PM2016-10-14T17:13:44+5:302016-10-14T17:14:17+5:30
सोलापूरचे कलेक्टर रणजित कुमार सर्वसामान्य भाविकाप्रमाणे सहकुटुंब रांगेत उभे राहून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १४ - सोलापूरचे कलेक्टर रणजित कुमार यांनी सर्वसामान्य भाविकाप्रमाणे सहकुटुंब रांगेत उभे राहून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यांनी रांगेत उभे राहून वारक-यांशीही संवाद साधला.
शुक्रवारी कलेक्टर येणार अशी मंदिर समितीच्या कर्मचा-यांमध्ये सकाळपासून चर्चा होती. दुपारचे १२ वाजून गेले तरीही ते आले नाहीत म्हणून सर्वजण वाट पाहत होते. अखेर ते आले पण ते केव्हा आले? कुठे आहेत? काहीच थांबपत्ता लागेना? नंतर समजले की ते दर्शनमंडपातून वारक-यांशी संवाद साधून रांगेतून सहकुटुंब येत आहेत.
अखेर जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी सहकुटुंब दर्शनही घेतले़ दर्शनानंतर त्यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि नवरात्रोत्सवाची सांगता असल्याने तयार केलेला काला (ज्वारीच्या लाह्या, दही, सफरचंद, डाळींब, पेरू व मलासाला आदींचे मिश्रण) प्रसाद म्हणून देण्यात आला.
जीवनातील अविस्मरणीय दिवस
रणजित कुमार आपण थेट दर्शन न घेता रांगेतून आलात याबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्ही नेहमी थेट दर्शन घेतोच, पण आज विशेषच! कारण माझ्यासोबत आई, वडील, बहीण, पत्नी आणि मुलगा आहे. म्हणून आज रांगेतून दर्शन घेण्याचा योग आला. रांगेतून आल्यानंतर काय वेगळा अनुभव? असे विचारले असता रांगेतून आल्यामुळे वारक-यांची भावना अनुभवता आली. त्यांच्यासाठी आणखी काय सोयी-सुविधांची गरज आहे हे कळाले.
सहकुटुंब घेतले दर्शन
जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्यासोबत वडील रामकिशोर राय, आई सुनीलादेवी राय, पत्नी संपदा मेहता, बहीण रेखा भारती, मुलगा ओम आणि बहिणीची मुले प्रांजल व सपना या आठ जणांनी दर्शनमंडपापासून रांगेतून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले़