कॉलेज तरुणीचे अपहरण

By Admin | Published: October 12, 2016 06:34 AM2016-10-12T06:34:34+5:302016-10-12T06:34:34+5:30

विरार पूर्वेकडील वीस वर्षीय कॉलेज तरु णीचे अपहरण करून नंतर तिला पालघर रेल्वे स्टेशनवर सोडण्यात आल्याची घटना

College girl kidnapped | कॉलेज तरुणीचे अपहरण

कॉलेज तरुणीचे अपहरण

googlenewsNext

विरार : विरार पूर्वेकडील वीस वर्षीय कॉलेज तरु णीचे अपहरण करून नंतर तिला पालघर रेल्वे स्टेशनवर सोडण्यात आल्याची घटना घडली. ९ आक्टोबरला दुपारी तीनच्या सुमारास शाईन शेखचे दुपारी तीनच्या सुमारास घराजवळून सरबजित विश्वकर्मा, पंकज विश्वकर्मा आणि पंकजचा मित्र अशा तिघांनी अपहरण केल्याची तक्रार तिची आई आसिफा शेखने केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम हाती घेतली होती. दुस-या दिवशी १० आॅक्टोबरला सकाळी अकराच्या सुमारास पालघर रेल्वे स्टेशनवर शाईनला सोडण्यात आले होते. शाईनने स्वत: आपल्या नातेवाईकाला फोन करून आपण पालघर रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती दिली होती.
दरम्यान, अपहरण प्रकरणात शाईन कोणतीही माहिती देत नसल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत. आपल्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. पुढे काय झाले, पालघर स्टेशनवर कशी पोहचली याबाबत शाईनकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर शारिरिक अत्याचार झाले नसल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून तिघेही फरार आहेत. (वार्ताहर)

Web Title: College girl kidnapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.