कोरोना संकट गेल्यानंतरच महाविद्यालये सुरू होणार- उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 08:05 PM2021-07-10T20:05:04+5:302021-07-10T20:05:24+5:30

Uday Samant : तोवर महाविद्यालये सुरू करणार नाही, अशी आपली स्पष्ट भूमिका असल्याचे उदय सामंत म्हणाले.

Colleges will start only after the Corona crisis is over- Uday Samant | कोरोना संकट गेल्यानंतरच महाविद्यालये सुरू होणार- उदय सामंत

कोरोना संकट गेल्यानंतरच महाविद्यालये सुरू होणार- उदय सामंत

Next

बुलडाणा: कोरोनाचे संकट जात नाही तोवर राज्याील महाविद्यालये सुरू करण्यात येणार नसल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुलडाणा येथे शनिवारी स्पष्ट केले.जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मिळालेल्या व्हेंटीलेटर्सच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते बुलडाण्यात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आ. संजय गायकवाड, डॉ. संजय रायमुलकर आणि बुलाडणा बाजार समितीचे सभापती जालिंधर बुधवत यांच्यासह जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती व अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यात कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्या धर्तीवर महाविद्यालये कधी सुरू करणार यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त बाब स्पष्ट केली. कोरोनाचे संकट जात नाही, तोवर महाविद्यालये सुरू करणार नाही, अशी आपली स्पष्ट भूमिका असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, नारायण राणे यांना केंद्रात देण्यात आलेले मंत्रीपद हे शिवसेनेला शह देण्यासाठी दिले गेले आहे, अशी चर्चा आहे. त्यासंदर्भाने आपली भूमिका काय? असे विचारले असता केंद्रात महाराष्ट्रातील दहा व्यक्तींनाही मंत्रीपद दिले गेले तरी ते शिवसेनेला रोखू शकत नाही. त्यामुळे त्यांनी खुशाल मंदीपदे द्यावीत तो त्यांचा (भाजपचा) विषय आहे. दरम्यान नारायण राणेंना मंत्रीपद केंद्रा मिळाल्यानंतर राज्यातील शिवसेना जिल्हा प्रमुखांची तातडीने बैठक घेण्यात आली याबाबत विचारणा केली असता शिवसेनची ताकद मोठी असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Colleges will start only after the Corona crisis is over- Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.