‘त्या’ इमारतींची रंगरंगोटी!
By admin | Published: September 1, 2015 01:10 AM2015-09-01T01:10:04+5:302015-09-01T01:10:04+5:30
जिल्हा परीषदेच्या मुख्य इमारतीचे प्लॅस्टर काही महिन्यांपूर्वी निखळले होते. त्यामुळे ही इमारत धोकादायक झाली आहे. धोकादायक झालेल्या या इमारतीसह
Next
ठाणे : जिल्हा परीषदेच्या मुख्य इमारतीचे प्लॅस्टर काही महिन्यांपूर्वी निखळले होते. त्यामुळे ही इमारत धोकादायक झाली आहे. धोकादायक झालेल्या या इमारतीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील इतर धोकादायक इमारतीचीदेखील ठाणे जिल्हा परिषदेने रंगरंगोटी केल्याचे उघड झाले आहे. धोकादायक असलेल्या मुख्य इमारतीमधील जिल्हा परिषदेचा आस्थापना विभाग हलवून तो पदाधिकाऱ्यांच्या प्रगती बिल्डिंगमधील पार्किंगच्या जागेत सुरू करण्यात आला आहे.
कार्यालयाच्या आवारातील इमारत पाडण्यासाठी निविदा मागण्याची कार्यवाही सुरू असतानाही त्यावर रंगरंगोटीचा खर्च करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)