रंगारंग पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार ‘या’ सेलिब्रेटींच्या फॅशनचा जलवा

By Admin | Published: January 30, 2017 03:48 AM2017-01-30T03:48:23+5:302017-01-30T03:48:30+5:30

कॉटनकिंग प्रस्तुत ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डचे आयोजन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी इंडिया लिमिटेड आहेत.

The colorful award ceremony will be seen in the 'The' Celebration of Celebration Fashion's Fashion | रंगारंग पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार ‘या’ सेलिब्रेटींच्या फॅशनचा जलवा

रंगारंग पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार ‘या’ सेलिब्रेटींच्या फॅशनचा जलवा

googlenewsNext

मुंबई : कॉटनकिंग प्रस्तुत ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डचे आयोजन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी इंडिया लिमिटेड आहेत. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी, तसेच टीव्ही जगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योगजगतातील मान्यवर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील. मात्र, ‘लोकमत’च्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असणार आहे. कारण मोस्ट स्टायलिश पर्सनालिटिजना या पुरस्काराचे मानकरी होता येणार आहे.
या पुरस्कार सोहळ््याला हँडसम हंक हृतिक रोशन हजेरी लावणार आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी नवीन लूकमध्ये तो पाहायला मिळेल. या वेळी तो स्पोर्टी नाही, तर डॅशिंग लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. ब्लेझर लूकमध्ये हृतिक या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावणार आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात सोनम कपूरने डेनिम साडी परिधान करत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा ती अशाच हटक्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. या वेळी ती डिसेंट लूक असलेला वनपीस परिधान करून सगळ्यांना आपल्या अंदाजाने घायाळ करणार आहे. मराठमोळी मुलगी अभिनेत्री सई ताम्हणकरही या सोहळ्यावेळी हजेरी लावणार आहे. त्यामुळे या सोहळ्यावेळी तिची स्टाईल कशी असणार, याचीही साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. तर यासाठी तिने विशेष तयारी केली आहे.
या वेळी ती आपल्याला इंडोवेस्टर्न आउटफिटमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे हटके स्टाईल करत, इतर सेलिब्रेटीसुद्धा आपल्या स्टायलिश लूकने या सोहळ्याला चारचाँद लावणार आहेत.
वेस्टर्न आउटफिटमध्ये राधिका आपटे स्वत:ला प्रेझेंट करताना दिसेल. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होममिनिस्टर म्हणजेच अमृता फडणवीस, युथ आयकॉन असलेले शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The colorful award ceremony will be seen in the 'The' Celebration of Celebration Fashion's Fashion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.