आदिवासींच्या घरावर ‘वारली’ची रंगरंगोटी
By Admin | Published: November 1, 2016 05:07 PM2016-11-01T17:07:04+5:302016-11-01T17:07:04+5:30
मुलभूत सुविधांपासून कोसोदूर असलेल्या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांच्या घरावर भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेल्या ‘वारली’ चित्रांची रंगरंगोटी करून,
>ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि.01 - मुलभूत सुविधांपासून कोसोदूर असलेल्या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांच्या घरावर भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेल्या ‘वारली’ चित्रांची रंगरंगोटी करून, तरुणाईच्यावतीने दीपावली साजरी करण्यात आली. यावेळी आदिवासी पाड्यातील आदिवासीं मुलांना कपडे आणि मिठाईचे देखील वितरण करण्यात आले.
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या चाळीसटापरी गावात दिपावलीपूर्वी अनेक आदिवासींच्या घरावर वारली चित्रांची रंगरंगोटी करण्यात आली. यासाठी खामगाव येथून तरुणाईच्या एका पथकासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चाळीसटापरी या आदिवासी गावात भेट दिली. यावेळी चाळीसटापरी येथील मुकेश, देविदास, जगदीश, अनिल यांच्यासह अनेक आदिवासीं बांधवांच्या घरावर आदिवासी चित्रशैलीतील त्यांचे जीवन, सणउत्सव, पर्यावरण संदेश या विषयावर ‘वारली’ चित्र रंगविण्यात आले. त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवाना दिवाळीची मिळाई वितरीत करण्यात आली. त्याचप्रमाणे काही आदिवासी मुलांना दैनंदिन उपयोगी साहित्याचेही वितरण तरुणाईच्यावतीने करण्यात आहे. यावेळी तरुणाईचे मनजीतसिंह शिख, राजेंद्र कोल्हे, उमाकांत कांडेकर यांच्यासह तरुणाईचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. तरुणाईच्या अनेक पदाधिकाºयांनी आपल्या घरी दिवाळी न साजरी करता, आदिवासी पाड्यातील सालईबन येथे आदिवासींसोबत दिवाळी साजरी केली.
वारली चित्राची रंगोटी करुन आदिवासी पाड्यात दिवाळी साजरी करताना.
४आदिवासी जीवन शैलीतील ‘वारली’ चित्र शैलीचा आदिवासी पाड्यातील अनेकांना विसर पडला आहे. दरम्यान, तरुणाईच्यावतीने आदिवासी पाड्यातील विविध घरांवर वारली चित्र शैलीतून विविध चित्र रंगविण्यात आले. त्यामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासींसाठी ही दिवाळी अतिशय नाविण्यपूर्ण ठरली.