रंगणा:या भिंती, पोस्टर काळाच्या पडद्याआड

By admin | Published: October 1, 2014 12:06 AM2014-10-01T00:06:31+5:302014-10-01T00:06:31+5:30

आचारसंहितेचा कठोर अंमल सुरू झाल्यानंतर रंगविल्या जाणा:या ¨भंती दिसेनाशा झाल्या आणि प्रचार साहित्याची निर्मिती किचकट असण्याचा काळ ओसरला.

Coloring: The walls, behind the scenery of the poster period | रंगणा:या भिंती, पोस्टर काळाच्या पडद्याआड

रंगणा:या भिंती, पोस्टर काळाच्या पडद्याआड

Next
>पुणो : आचारसंहितेचा कठोर अंमल सुरू झाल्यानंतर रंगविल्या जाणा:या ¨भंती दिसेनाशा झाल्या आणि प्रचार साहित्याची निर्मिती किचकट असण्याचा काळ ओसरला. अनेक वर्षापासून फलक रंगविणारे चित्रकार, चांगले हस्ताक्षर असलेले कलाकार यांचे नावनिशाणही राहिलेले नाही. मुद्रणालयांमध्ये छापली जाणारी पोस्टर, हँडबिल यांचेही दर्शन सध्याच्या निवडणुकांमध्ये दुर्मिळ झाले आहे.
टी. एन. शेषन यांनी मुख्य निवडणूक आयुक्त असताना कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली, सुधारणा केल्या. सार्वजनिक ठिकाणो विद्रूप होतील, अशा भडक प्रचाराला बंदी आली. त्यापूर्वी कार्यकर्ते उमेदवारांचे प्रचार चिन्ह आणि नाव ¨भंतींवर रंगवीत असत. चांगली रंगरंगोटी असलेल्या ¨भंतींवर पांढ:या रंगाचा मजकूर रातोरात उमटत असे.
स्थानिक कार्यकर्ते अशा ¨भंती रंगविण्यात आघाडीवर असत. त्यामुळे नागरिक त्यांच्याशी वादावादी करण्याच्या फंदात पडत नसत.
उमेदवारांचे प्रचार फलक महत्त्वाच्या चौकांमध्ये आणि संख्येने कमी असत. याचे कारण उमेदवाराचे चित्र काढणारे आणि सुबक अक्षरांत मजकूर लिहिणारे कलाकार तुलनेने कमी असत. त्यांच्याकडे विधानसभा, लोकसभा किंवा महापालिकांच्या निवडणुकांच्या काळात कामाची प्रचंड रेलचेल असे. उमेदवाराचे, नामवंत नेत्याचे रेखाचित्र आखून त्यावर बारकाईने रंगकाम करण्याचे, त्या नेत्याची हुबेहूब प्रतिमा पांढ:या कापडावर उतरविण्याचे आव्हान कलाकारांवर असे.
कलावंतांच्या व्यस्ततेमुळे वेळेत फलक बनवून मिळत नसल्याने उमेदवार कार्यकत्र्यावर अवलंबून असत. शिडय़ा लावून उंचावरच्या ¨भंती रात्रीच्या वेळी रंगविल्या जात. शिवाजीनगर गावठाण व परिसरात अद्यापही 3क्/35 वर्षापूर्वी घोषणांनी रंगविलेल्या ¨भंती दिसून येतात. संगणक क्रांती आल्यानंतर पोस्टरची जागा फ्लेक्स बोर्डानी आणि पोस्टरची जागा प्रचारपत्रकांनी घेतली. काही तासांमध्ये तयार करून मिळणा:या या साहित्यामुळे उमेदवारांच्या कार्यकत्र्यामध्ये निर्धास्तपणा आहे. चित्रकार, कलाकार यांची जागा आता ग्राफिक डिझाईनर्स आणि डीटीपी ऑपरेटरनी घेतली आहे.
 
बाळासाहेब, राजीवजींची पोस्टर अजूनही स्मरणात
4फडके हौद चौकात इरार आर्ट्स आणि अन्य एका ठिकाणी असलेले श्रीकृष्ण आर्ट्स, पेंटर बेडेकर अशा मोजक्याच ठिकाणी फलक तयार केले जात. निवडणुका नसताना अशा स्टुडिओंमध्ये चित्रपटांचे फलक रंगविले जात. 2क् वर्षापूर्वीची, युतीच्या काळातील बाळासाहेब ठाकरे यांची लक्षवेधी पोस्टर किंवा राजीव गांधी यांची प्रतिमा असलेली पोस्टर अजूनही स्मरणात आहेत.
रात्रीचा दिवस करीत असू
4त्या काळात उमेदवारांच्या छापील पोस्टरवर भर असे. उमेदवाराचे, राष्ट्रीय नेत्याचे छायाचित्र असलेला ब्लॉक तयार करून त्याची छपाई करून घेण्यासाठी मुद्रणालयांमध्येही गर्दी होत असे. अशी छापलेली पोस्टर खळीने चिकटविण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करीत असू, अशी आठवण काँग्रेसचे कार्यकर्ते चंद्रशेखर कपोते यांनी सांगितली.
 

Web Title: Coloring: The walls, behind the scenery of the poster period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.