कुपोषणमुक्तीसाठी एकत्र या!

By Admin | Published: August 4, 2016 02:36 AM2016-08-04T02:36:44+5:302016-08-04T02:36:44+5:30

जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करून कुपोषणाला हद्दपार करू या, असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी केले.

Combine for the elimination of malnutrition! | कुपोषणमुक्तीसाठी एकत्र या!

कुपोषणमुक्तीसाठी एकत्र या!

googlenewsNext


पालघर : जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करून कुपोषणाला हद्दपार करू या, असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी केले.
भारत सरकार आणि इंडियन अ‍ॅकॅडॅमी आॅफ पेडिया ट्रिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डीएसएम इंडियाच्या सीएसआर फंडातून जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना टॅब तसेच प्रत्येक अंगणवाडी सेविकांना मायक्र ो-एसडी कार्डाचे वितरण पालघर येथे शुक्रवारी संपन्न झाले, त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास सभापती विनिता कोरे, कृषी सभापती अशोक बडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकांना वितरीत करण्यात येणाऱ्या या मायक्र ो-एसडी कार्डामध्ये महिला व बालकुपोषणविरुद्ध लढण्यासाठी चार शैक्षणिक व्हिडीओ आहे. हे कार्ड कोणत्याही प्रकारच्या मोबाइलमध्ये बसवून त्याद्वारे मुलांमध्ये तसेच त्यांच्या पालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करणार आहे.
अंगणवाडी सेविकांना आध्यात्मिक पद्धतीने मानसिक व शारीरिकदृष्ट्या कुपोषणावर मात करण्यासाठीचे प्रशिक्षण पुढील महिन्यात सर्व अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार आहे. मार्च २०१७ पर्यंत सर्व अंगणवाड्या स्मार्ट होतील व त्या कुपोषणमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले व त्यांचे सहकारी नागेंद्र कुमार, जिल्हा परिषद पालघरमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) प्रकाश देवऋषी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.व.बा.) राजेंद्र पाटील तसेच अधिकारी कर्मचारी मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
>‘पोषण’ या कार्यक्र मांतर्गत ही जनजागृती मोहीम राज्यात पालघरसह ठाणे व पुणे जिल्ह्यात राबविली जाणार असून हे शैक्षणिक साहित्य ५२ लाख मुलांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या सर्व कामात अंगणवाडी सेविकांचे महत्त्वपूर्ण कार्य असून आपण सदैव अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी उभ्या राहू, अशी ग्वाही सुरेखा थेतले यांनी याप्रसंगी दिली.

Web Title: Combine for the elimination of malnutrition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.