राजकीय अजेंड्यावर पर्यावरण यावे
By admin | Published: February 29, 2016 03:28 AM2016-02-29T03:28:02+5:302016-02-29T03:28:02+5:30
निवडणुकीपूर्वी प्रत्येक राजकीय पक्ष शैक्षणिक, आर्थिक, संरक्षण विषयक धोरण अजेंड्याव्दारे मांडतो. त्याच पद्धतीने या पक्षांनी पर्यावरण विषयक धोरणही मांडले पाहिजे
जळगाव : निवडणुकीपूर्वी प्रत्येक राजकीय पक्ष शैक्षणिक, आर्थिक, संरक्षण विषयक धोरण अजेंड्याव्दारे मांडतो. त्याच पद्धतीने या पक्षांनी पर्यावरण विषयक धोरणही मांडले पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा तर सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष अभय उजागरे यांनी केले.
उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनास शनिवारी वाघूर धरणानजीकच्या परेश फार्म परिसरात सुरवात झाली.
प्रारंभी महाराष्ट्र जैव विविधता महामंडळाचे सदस्य सचिव दिलीपसिंह यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वालनाने उद्घाटन झाले.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष अभय उजागरे, सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे, मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) एस.व्ही. रामाराव, उप वनसंरक्षक (यावल) एम. एन. खैरनार, उप वनसंरक्षक आदर्श रेड्डी, सातपुडा बचाव समितीचे निमंत्रक राजेंद्र नन्नवरे आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष भवरलाल जैन, लिमजी जळगाववाला यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (प्रतिनिधी)