आ. दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल

By admin | Published: June 14, 2017 01:53 AM2017-06-14T01:53:30+5:302017-06-14T01:53:30+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्यासह १२५ जणांविरूद्ध मंगळवारी फौजदारी गुन्हा दाखल झाला.

Come on. Filed under Dilip Sopal | आ. दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल

आ. दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी (जि. सोलापूर) : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्यासह १२५ जणांविरूद्ध मंगळवारी फौजदारी गुन्हा दाखल झाला. हे वृत्त समजताच शहरातील अनेक दुकानदारांनी दुकाने बंद केली. खबरदारी म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एप्रिल १५ ते मार्च १६ या कालावधीत एक कोटी, पाच लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षणात दिसून आले. या काळात सोपल हे बाजार समितीचे सभापती होते. त्यामुळे सोपल यांच्यासह उपसभापती, सचिव, संचालक मंडळ आणि कामगारांसह एकुण १२५ जणांवर बार्शी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे यांनी सांगितले की, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निधीचा अपहार, जमिनीतील वसूल भाड्यामध्ये अपहार, बाजार समितीत तसेच जमिनीवर अतिक्रमण, नियमबाह्य हंगामी व रोजगार भरती, चुकीच्या दिवशी व गैरहजर कालावधीत कर्मचारी यांना वेतन अदा करणे, तसेच शासकीय दस्तऐवजात बेकायदेशीर बदल करणे अशा प्रकारात एकूण एक कोटी पाच लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले.
जिल्हा विशेष लेखापरीक्षक (सहकारी संस्था सोलापूर) विष्णू डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Come on. Filed under Dilip Sopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.