आ गया.. नॉडी!
By admin | Published: June 25, 2015 01:04 AM2015-06-25T01:04:14+5:302015-06-25T01:04:14+5:30
‘आओ सब झुमे... सब गाये... है सुना सहाना दिन’ असे म्हणत टॉयटाऊनमधल्या आपल्या दोस्तांना गिफ्ट वाटत येणारा ‘नॉडी’ म्हणजेच सगळ्यांचा बेश्ट फ्रेंड.
प्रतिनिधी -
‘आओ सब झुमे... सब गाये... है सुना सहाना दिन’ असे म्हणत टॉयटाऊनमधल्या आपल्या दोस्तांना गिफ्ट वाटत येणारा ‘नॉडी’ म्हणजेच सगळ्यांचा बेश्ट फ्रेंड. पिवळ्या आणि लाल रंगाच्या टॅक्सीमध्ये डोक्यावरच्या टोपीवर घुंगरू असणाऱ्या नॉडीचा जन्म १९५० साली पुस्तकरूपाने झालाय. ब्रिटिश टेलिव्हिजन विश्वात १९५५ साली आलेले हे कार्टुन भारतात येण्यासाठी मात्र २००० साल उजाडावे लागले. तेव्हापासून भारतातील चिमुरड्यांचेही हे फेव्हरेट कार्टुन ठरलंय. धडपड्या स्वभावामुळे असो वा मित्र-मैत्रिणींच्या मस्तीमुळे सतत प्रॉब्लेम्समध्ये अडकणाऱ्या नॉडीला त्याचा पाळीव कुत्रा बम्पी डॉग नेहमीच साथ देतो. मार्था मंकी, मि. पॉल्ड, टबी बेअर, मि. गॉली, बंकी आणि मि. मिल्को अशा आपल्या मित्रमंडळीसह धम्माल करणारा नॉडी लाकूडतोड्या आहे. या टॉयटाऊनमध्ये चोरांना धडे शिकवणं, छोट्यांसाठी आइस्क्रीम तयार करणं आणि टॉय एक्स्प्रेससाठी काम करणं अशी सगळी कामं गुडबॉय ‘नॉडी’ करतो.