...अब आए अपने-अपने ‘औकात’ पें!
By admin | Published: January 30, 2017 12:08 AM2017-01-30T00:08:42+5:302017-01-30T00:08:42+5:30
शिवसेना-भाजपा युतीत फारकतीची घोषणा सेनेकडून झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची ‘औकात’ दाखवून देऊ
धनंजय वाखारे, नाशिक
शिवसेना-भाजपा युतीत फारकतीची घोषणा सेनेकडून झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची ‘औकात’ दाखवून देऊ, अशा शब्दांत प्रहार केला, तर ‘आमची औकात लवकरच कळेल’ असे प्रत्युत्तर शिवसेनेने भाजपाला दिले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आता दोन्ही पक्ष आपल्या ‘औकाती’वर आले असताना, त्यात सोशल मीडिया मागे कसा राहील. दोन दिवसांपासून व्हॉट्स अॅप- फेसबुकवर ‘औकात’ शायरींनी धमाल चालविली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत युती तोडण्यावरून सेना-भाजपात शाब्दिक राडा सुरू झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर आरोप करत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आणि त्यानंतर लगोलग दुसऱ्या दिवशी भाजपाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची ‘औकात’ काढत चुचकारले. भाजपाने प्रहार केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘त्यांना आमची औकात दाखवून देऊ’ असे प्रतिआव्हान दिले आहे.
एकमेकांची ‘औकात’ काढण्याचा हा खेळ सुरू झाल्यानंतर युतीला मानणाऱ्या मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, या ‘औकात’ शब्दाने सोशल मीडियावर शेरो-शायरींची बरसात सुरू झाली आणि व्हॉट्स अॅप व फेसबुकवर दिवसभर ठाण मांडून बसणाऱ्यांना चघळायला आयताच एक विषय चालून आला.
‘बिगड रहा हो वक्त तो, न कोई हालात पूछता हैं, टकरा जाता हैं कोई अनजाने में, तो सबसे पहले औकात पूछता हैं’, या शायरीतून शिवसेनेची दोलायमान स्थिती दर्शविली जात आहे. त्यावर, भाजपाला मानणाऱ्यांकडून प्रत्युत्तर देताना म्हटले आहे, ‘दिखा दी हैं औकात, जिन्हे हम अपना मानते थे, वोही निकले बेवफा, जिन्हे सबसे करीब मानते थे’ एक सेना समर्थक म्हणतो, ‘बात तो औकात की होती हैं, जिंदगी में अक्सर, कोई बता जाता हैं, कोई दिखा जाता हैं’ याशिवाय, ‘बुरे वक्त के साथ जो मैने अपनी मुलाकात देखली, किसी की सच्चाई और किसी की औकात देखली’, ‘बदल गयी हैं जिंदगी, किसी के दिन और किसी की रात, अब वो लहजा कहॉ हैं, उसके अल्फाजों में देखो आज किसी की औकात बदल गयी हैं’, ‘गरीबों की औकात ना पूछो तो अच्छा हैं, इनकी कई जात ना पूछो तो अच्छा हैं, चेहरे कई बेनकाब हो जायेंगे, ऐसी कोई बात ना पूछों तो अच्छा हैं’... यांसारख्या शेरो-शायरी व्हॉट्स ग्रुपवर फॉरवर्ड होत आहेत.