MNS Raj Thackeray : “राजकारणात या… मी संधी द्यायला तयार आहे,” राज ठाकरेंनी केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 01:04 PM2022-12-30T13:04:00+5:302022-12-30T13:04:42+5:30
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला मोठं आवाहन केलं आहे.
राजकारणात यायचं म्हणजे फक्त निवडणूक लढवायची असं नाही. राजकारणाला अनेक अंग आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या क्षेत्रात आपलं योगदान देऊ शकता. आज अनेक डॉक्टर असे आहेत की ज्यांनी डॉक्टरकी सोडून अभिनयात करिअर केलं. मग इतर क्षेत्रातील तरुण राजकारणात का येऊ शकत नाहीत?, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यातील कार्यक्रमादरम्यान केला होता. त्यानंतर आथा पुन्हा त्यांनी आपण संधी द्यायला तयार आहोत, राजकारणात या असं आवाहन केलं आहे.
“बरबटलेलं राजकारण बदलायचं असेल तर मी महाराष्ट्राला आवाहन करु इच्छितो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, कोणत्याही वयोगटाचे असा राजकारणात या.. मी संधी द्यायला तयार आहे,” असं राज ठाकरे म्हणाले.
राजकरणात या, आम्ही संधी द्यायला तयार आहोत... राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नाहीत. राजकारणातही अनेक अंग आहेत तुम्ही राजकारणाच्या कोणत्याही कक्षेत योगदान देऊ शकता !#राजठाकरे#महाराष्ट्रधर्म#हिंदवीस्वराज्य#मनसे#RajThackerayVisionpic.twitter.com/bRfPSMc4Q6
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 30, 2022
यापूर्वी काय म्हणाले होते राज ठाकरे?
राजकारण वाईट नसून ते नासवलं जात आहे. सध्या राजकारणाला फाटे फुटत आहेत. आयुष्यात काहीही घडत नाही म्हणून राजकारणात यायचं असं चित्र सध्या झालं आहे. ते बदलणं तुमच्याच हातात आहे, असं पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले होते. पुण्यात बुधवारी सहजीवन व्याख्यानमालेत 'नवं काहीतरी...' या विषयावर आयोजित व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात राज ठाकरे यांनी आपले विचार मांडले होते.