दहशतवादाविरुद्ध एकत्र या !

By Admin | Published: November 16, 2015 03:51 AM2015-11-16T03:51:12+5:302015-11-16T03:51:12+5:30

दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी जागतिक पातळीवरून एकत्रित प्रयत्न होण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ब्रिक्स नेत्यांच्या परिषदेत ते बोलत होते

Come together against terrorism! | दहशतवादाविरुद्ध एकत्र या !

दहशतवादाविरुद्ध एकत्र या !

googlenewsNext

अंताल्या (तुर्कस्तान) : दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी जागतिक पातळीवरून एकत्रित प्रयत्न होण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ब्रिक्स नेत्यांच्या परिषदेत ते बोलत होते. तर इसिसविरुद्धची कारवाई आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला.
जी-२० शिखर संंमेलनात सहभागी होण्यासाठी येथे आलेल्या नेत्यांनी फ्रान्समधील हल्ल्याचा निषेध केला. मोदी म्हणाले की, दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे उभे राहायला हवे; कारण या जागतिक स्तरावरील प्रयत्नांची आज जेवढी गरज आहे तेवढी यापूर्वी कधीही नव्हती. भारत फेब्रुवारी २०१६मध्ये ब्रिक्स समूहाच्या अध्यक्षतेची जबाबदारी स्वीकारणार आहे तेव्हा दहशतवादाविरुद्ध लढा देणे हीच आमची प्राथमिकता असेल. तथापि, आजही दहशतवादाविरुद्धची लढाई हीच ब्रिक्स समूहाची प्राथमिकता असायला हवी. (वृत्तसंस्था)
‘इसिस’च्या एका संशयित जिहादीने आत्मघातकी स्फोट घडवून स्वत:ला उडवून दिले. या घटनेत चार पोलीस जखमी झाले. ही घटना सिरियाच्या सीमेनजीक दक्षिण-पूर्व तुर्कस्तानात घडली.शनिवारी उशिरा
रात्री गाजियानतेप या शहरात पोलिसांनी एका अपार्टमेंटवर छापा मारला असता स्वत:च्या शरीराभोवती स्फोटके बांधलेल्या या अतिरेक्याने स्वत:ला उडवून दिले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.अंकारा येथे १० आॅक्टोबर रोजी एका शांतता रॅलीत दोन आत्मघातकी स्फोट होऊन १०२ जण ठार झाले होते. त्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी हा छापा मारला होता. त्यातून हा प्रकार घडला.शिखर परिषदेवर दहशतीचे सावट
तुर्कस्तानच्या अंताल्या शहरात प्रमुख जागतिक नेते जी-२० शिखर परिषदेसाठी एकत्र आले असताना ही घटना घडली. या परिषदेत दहशतवादाविरुद्धचा लढा हाच मुख्य विषय राहणार आहे. काल याच शहरात लष्कराने कारमधून जाणाऱ्या ‘इसिस’च्या चार संशयित अतिरेक्यांना गोळ्या घालून ठार मारले होते. याशिवाय काल ‘इसिस’च्या सात संशयित अतिरेक्यांना अटक केली होती.
अभूतपूर्व सुरक्षा
फ्रान्समधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्तानमध्ये होत असलेल्या जी-२० परिषदेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अंताल्या येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी १२ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. इसिसला नेस्तनाबूद करणार
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की, इसिसला नेस्तनाबूद करण्याची मोहीम आम्ही आणखी तीव्र करणार आहोत. तथापि, फ्रान्स हल्ल्यातील सूत्रधारांना पकडण्यासाठी सर्वतोपरी मदत करू.
आंतरराष्ट्रीय समुदाय एकत्र आला तरच आपल्याला दहशतवादाविरुद्ध आक्रमकपणे लढता येईल.
- ब्लादिमिर पुतीन,
राष्ट्रपती, रशिया

Web Title: Come together against terrorism!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.