उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत रचणाऱ्या कुणाल कामराला दुसऱ्यांदा समन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 05:39 IST2025-03-27T05:38:40+5:302025-03-27T05:39:24+5:30
चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मागितल्याची कुणालची विनंती पोलिसांनी फेटाळली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत रचणाऱ्या कुणाल कामराला दुसऱ्यांदा समन्स
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत रचणारा स्टैंड अप कॉमेडियन कुणाल कामरा याला पोलिसांनी दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. कामराने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मागितला होता. परंतु पोलिसांनी त्याची मागणी फेटाळून लावली आहे.
मुंबई पोलिसांनी कुणालला मंगळवारी पहिली नोटीस पाठवली होती. त्यावर कामराच्या वकिलांनी एक आठवडा वेळ देण्याची मागणी खार पोलिसांकडे केली होती. ही मागणी पोलिसांनी फेटाळून लावली असून, कामराला दूसरे समन्स जारी केले आहे.
हे समन्स कामराच्या वडिलांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, कामराने बुधवारी नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यात महागाई व 'निर्मलाताई' यांच्यावर टीकात्मक गाणे गायले आहे. यावरून वादात आणखीन भर पडली आहे.