प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेच्या ३६ पॅसेंजर गाड्या होणार एक्स्प्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 03:04 AM2020-10-25T03:04:14+5:302020-10-25T06:42:44+5:30
Central Railway News : या बदलामुळे गाड्यांच्या निर्धारित वेळेत व थांब्यांमध्ये बदल होऊ शकतो. वेग परिवर्तन व थांबे कमी केल्यास वेळेची बचत होऊ शकते.
कुर्डूवाडी (जि. सोलापूर) : मध्य रेल्वेच्या ३६ पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर आता एक्स्प्रेसमध्ये होणार आहे. याबाबत रेल्वे बोर्डाने सर्व झोनल अधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी हिरवा कंदील दाखवला. यामुळे वेळेची बचत होणार असली तरी प्रवाशांच्या खिशाला मात्र झळ पोहोचणार आहे.
या बदलामुळे गाड्यांच्या निर्धारित वेळेत व थांब्यांमध्ये बदल होऊ शकतो. वेग परिवर्तन व थांबे कमी केल्यास वेळेची बचत होऊ शकते.
या पॅसेंजर गाड्या होणार एक्स्प्रेस
सीएसटी-पंढरपूर-सीएसटी (आठवड्यातून तीन वेळा), दौंड-शिर्डी-दौंड, सीएसटी-भुसावळ-सीएसटी, भुसावळ-इटारसी-भुसावळ, देवळाली-भुसावळ-देवळाली, भुसावळ -कटनी-भुसावळ, इटारसी-प्रयागराज चौकी-इटारसी, भुसावळ-वर्धा-भुसावळ, मिरज-कॅसलरॉक-मिरज, यासह मिरज-हुबळी-मिरज, ११) पुणे-निझामाबाद-पुणे, परळी वैजनाथ-मिरज-परळी वैजनाथ, निझामाबाद-पंढरपूर- निझामाबाद, तसेच सोलापूर-फलकनुमा-सोलापूर (सर्व गाड्या रोज धावणाºया) इत्यादी.
या डेमू गाड्याही होणार एक्स्प्रेस : १. सोलापूर-गदग-सोलापूर, २. पुणे-सोलापूर-पुणे, ३. सोलापूर-पुणे-सोलापूर, ४. पुणे-कोल्हापूर-पुणे.