येणा-या काळात नोक-या मिळणार नाहीत! : भाजपा प्रवक्ते माधव भांडारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:38 AM2018-02-12T02:38:45+5:302018-02-12T02:39:00+5:30
जगभरात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत असल्याने उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील नोक-यांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होत असून, येणा-या काळात रोजगाराचा पर्याय म्हणून नोक-या उपलब्ध होणार नाही.
नाशिक : जगभरात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत असल्याने उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील नोक-यांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होत असून, येणा-या काळात रोजगाराचा पर्याय म्हणून नोक-या उपलब्ध होणार नाही. त्यामुळे तरुणांना नोक-या मिळविण्यापेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले आहे.
सातपूर येथे ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलतर्फे (बीबीएनजी) माधव भांडारी यांच्या हस्ते ‘उद्यम कौस्तुभ २०१८’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
भांडारी म्हणाले, येणाºया काळात अंगभूत गुणवत्तांच्या आधारेच उद्योग व्यवसाय करावा लागणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली ज्ञान संपन्नता ब्राह्मण समाजात आहे. यापुढील काळात समाजाने ज्ञान कौशल्याच्या अधारे शेती सुधारणा, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, कृषिमाल प्रक्रिया उद्योग क्षेत्राकडे वळून अंतर्गत सहकार्याच्या भावनेतून समाज विकास साधण्याचे आवाहन भांडारी यांनी या वेळी केले,
उद्यम कौस्तुभ, जीवन गौरव पुरस्कार प्रदान
ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलतर्फे चितळे उद्योगाचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्यासह एमएमजेसी सल्लागार कंपनीचे संस्थापक मकरंद जोशी, बांधकाम व्यावसायिक विवेक देशपांडे, उद्योजक नितीन केळकर व राजेंद्र बेडेकर यांचा उद्यम कौस्तुभ पुरस्कार २०१८ देऊन सन्मान करण्यात आला. समाजातील उद्योजकांना साहाय्य करणाºया ‘दे आसरा’ या समाजिक संस्थेलाही कौस्तूभ पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर भारत-इस्राइल संबंधांची पायाभरणी करणारे एन.बी.एच. कुलकर्णी यांना या वेळी जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.