आयुक्तांचा पीए राजेंद्र शिर्के लाच घेताना अटक
By Admin | Published: April 25, 2017 02:24 AM2017-04-25T02:24:49+5:302017-04-25T02:24:49+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मावळते आयुक्त दिनेश वाघमारे यांचा स्वीय सहायक राजेंद्र सोपान शिर्के (वय ४३) याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले.
पिंपरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मावळते आयुक्त दिनेश वाघमारे यांचा स्वीय सहायक राजेंद्र सोपान शिर्के (वय ४३) याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले.
तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून, त्यांचे थेरगाव येथे अकरा इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यापैकी सात इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे. इतर चार इमारतींच्या दाखल्याची फाईल सादर करून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शिर्के याने बारा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील दोन लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला ताब्यात घेतले.
दोन दिवसांपूर्वीच आयुक्त वाघमारे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती झाली आहे. परंतु, अद्याप हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पदभार स्वीकारलेला नाही. (प्रतिनिधी)