८७ मतदारसंघांतील खर्चावर आयोगाचा वॉच; अतिरिक्त पथके नेमण्याचे निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 12:15 PM2024-10-26T12:15:24+5:302024-10-26T12:15:49+5:30

हे ८७ मतदारसंघ खर्च संवेदनशील म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केले आहेत

Commission's Watch on Expenditure in 87 Constituencies; Instructions to Election Officers to appoint additional teams | ८७ मतदारसंघांतील खर्चावर आयोगाचा वॉच; अतिरिक्त पथके नेमण्याचे निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश

८७ मतदारसंघांतील खर्चावर आयोगाचा वॉच; अतिरिक्त पथके नेमण्याचे निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: गेल्या सहा महिन्यांत, तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील ८७ विधानसभा मतदारसंघांमध्ये जप्त केलेल्या रोख रक्कम, मद्य, अंमली पदार्थ, तसेच भेटवस्तू वाटण्याचे प्रमाण, तसेच उमेदवारांच्या खर्चाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार हे मतदारसंघ खर्च संवेदनशील म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केले आहेत.

तसेच अन्य राज्यांच्या सीमेलगत असलेले विधानसभा मतदारसंघदेखील संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. यासाठी प्राप्तिकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, राज्य राखीव पोलिस बल व राज्य पोलिस दलाचा अभिप्राय ग्राह्य धरण्यात आला आहे. या मतदारसंघांमध्ये सध्या तैनात करण्यात आलेल्या पथकांव्यतिरिक्त आणखी स्थिर व भरारी पथक नेमण्याचे निर्देश संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या पथकांमध्ये राज्याच्या पोलिस विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याव्यतिरिक्त केंद्रीय सशस्त्र पोलिस बलाचे अधिकारी किंवा कर्मचारी नेमावेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

या जिल्ह्यांतील हे मतदारसंघ आहेत संवेदनशील

  • नंदुरबार     :    अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर
  • धुळे     :    साक्री, धुळे शहर, शिरपूर
  • जळगाव     :    चोपडा, जळगाव शहर, रावेर
  • बुलढाणा    :    मलकापूर, चिखली, बुलढाणा
  • अकोला    :    अकोला पश्चिम
  • अमरावती    :    बडनेरा
  • वर्धा    :    वर्धा
  • नागपूर    :    हिंगणा, नागपूर पूर्व, नागपूर मध्य
  • भंडारा    :    भंडारा
  • गोंदिया    :    गोंदिया
  • गडचिरोली    :    गडचिरोली
  • चंद्रपूर    :    चंद्रपूर, बल्लारपूर
  • यवतमाळ    :    यवतमाळ, आर्णी
  • नांदेड    :    किनवट, भोकर, देगलूर
  • परभणी     :    जिंतूर, परभणी
  • जालना    :    जालना
  • छ. संभाजीनगर    :    फुलंब्री, औरंगाबाद मध्य, गंगापूर
  • नाशिक    :    बागलाण, कळवण, दिंडोरी, नाशिक मध्य, इगतपुरी
  • पालघर    :    पालघर, डहाणू, वसई
  • ठाणे    :    भिवंडी पूर्व, मुरबाई, उल्हासनगर, डोंबिवली, ओवळा माजिवाडा, ठाणे, ऐरोली, बेलापूर
  • मुंबई उपनगर    :    वांद्रे पूर्व, कुर्ला, भांडुप पश्चिम
  • मुंबई शहर    :    माहिम, मुंबादेवी, कुलाबा
  • रायगड    :    पनवेल, कर्जत, उरण
  • पुणे    :    खेड, आळंदी, शिरूर, दौंड, बारामती, मावळ, चिंचवड, पिंपरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, पर्वती, हडपसर, पुणे कँटोन्मेंट
  • अहिल्यानगर    :    संगमनेर, अहमदनगर शहर
  • बीड    :    बीड, आष्टी
  • लातूर    :    निलंगा, औसा
  • धाराशिव    :    उमरगा
  • सोलापूर    :    सोलापूर शहर उत्तर, माळशिरस
  • सिंधुदुर्ग    :    सावंतवाडी, कणकवली
  • कोल्हापूर    :    चंदगड, कोल्हापूर उत्तर, शिरोळ
  • सांगली    :    सांगली

Web Title: Commission's Watch on Expenditure in 87 Constituencies; Instructions to Election Officers to appoint additional teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.