मराठा समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:54 AM2018-02-12T01:54:15+5:302018-02-12T01:54:26+5:30

मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यासाठी कौशल्य विकासासह विविध कर्ज योजना, शिक्षणविषयक योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

 Committed to the development of Maratha community, Chief Minister's testimony | मराठा समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मराठा समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Next

मुंबई : मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यासाठी कौशल्य विकासासह विविध कर्ज योजना, शिक्षणविषयक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून यासंदर्भातील न्यायालयीन अडचणी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.
मराठा बिझनेसमन फोरम व अखिल मराठा फेडरेशन यांच्यामार्फत आयोजित मराठा सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा समाजाच्या विविध संस्थांच्या फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत पवार, प्रवीण दरेकर, आ. कालिदास कोळंबकर, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, कमलकिशोर कदम आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा बिझनेसमन फोरमसारख्या विविध संस्थांनी मराठा समाजासाठी विविध शिक्षणविषयक, कौशल्य विकासविषयक योजना राबविण्यासाठी शासनासमवेत काम करावे. अशा संस्थांना नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात येईल. मराठा समाजासाठी राज्य शासनाने राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुरु केली, यातून ६०२ अभ्यासक्रमात फी प्रतिपूर्ती दिली जात आहे. मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बहुतांश मराठा समाज शेती व्यवसायात कार्यरत आहे. शेतीमध्ये विज्ञान, तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे ४०० कोटी रुपये खर्च करुन २.५ लाख तरुणांना कृषी क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना शासनाने हाती घेतली आहे. मरणासन्न झालेल्या आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला शासनाने मोठा निधी देऊन पुन्हा सक्षमपणे सुरु केले आहे. या महामंडळामार्फत मराठा समाजातील तरुणांसाठी कर्जे देण्यात येत आहेत.
मराठा बिझनेसमन फोरमने प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक हजार उद्योजक तयार करावेत. या तरुणांना शासनामार्फत कर्ज तथा व्याजसवलत उपलब्ध करून देऊ. मराठा बिझनेसमन फोरमने नोडल एजन्सी म्हणून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
समाजासाठी कार्य करणाºयांचा सन्मान-
मराठा समाजासाठी कार्य करणाºया खारघर मराठा समाज (नवी मुंबई), रत्नसिंधू मराठा मित्रमंडळ (नाशिक), कोकण मराठा संघ (पुणे), मराठा मंडळ (इचलकरंजी), श्री कुलस्वामिनी शारकाईदेवी मंडळ (बडोदे), वंदे मातरम युवा संघटन रोडमराठा (पानिपत), तेलंगणा मराठा मंडळ या संस्थांचा सन्मान करण्यात आला. मराठा भुषण पुरस्काराने डॉ. डी. जी. हापसे, बळीराम कदम, पं. प्रशांत गायकवाड, ललिता बाबर, शंकरराव कोल्हे, कमलकिशोर कदम, प्रा. नरेंद्र विचारे यांना सन्मानित करण्यात आले.

Web Title:  Committed to the development of Maratha community, Chief Minister's testimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.