प्लॅस्टिक उद्योगाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमली समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:39 AM2018-04-17T01:39:13+5:302018-04-17T01:39:13+5:30
प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर आणि नष्ट करण्यासंदर्भात उद्योजकांनी सुचविलेल्या पयार्यावर अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिव पातळीवरील एका समितीची स्थापना केली आहे.
मुंबई : प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर आणि नष्ट करण्यासंदर्भात उद्योजकांनी सुचविलेल्या पयार्यावर अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिव पातळीवरील एका समितीची स्थापना केली आहे.
आज मंत्रालयात प्लॅस्टिक उद्योजकांच्या बैठकीत प्लॅस्टिकचा वापर आणि ते नष्ट करण्याबाबत चर्चा झाली. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिवसेनेचे नेते अदित्य ठाकरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ही समिती उद्योजकांनी सादरीकरणातून मांडलेल्या मद्द्यांचा अभ्यास करून प्लॅस्टिक बंदीबाबत शासनाने नियुक्त केलेल्या शक्ती प्रदक्त समितीला अहवाल सादर करेल.
प्रारंभी प्लॅस्टिक उद्योजक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सादरीकरणातून प्लॅस्टिकचे होणारे रिसायकलिंग, त्यातून तयार होणाºया वस्तू, प्लॅस्टिकच्या कचºयाची विल्हेवाट, प्लॅस्टिक एकत्र करण्याची पद्धत, जनतेचा सहभाग, जनजागृती, शासनास करावयाचे सहकार्य आदीं संदर्भात माहिती देण्यात आली. या वेळी प्लॅस्टिक उद्योगातील अनेक उद्योजक उपस्थित होते.