चौर्य साहित्यावर नजर ठेवण्यास विद्यापीठातर्फे समितीची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 06:27 AM2017-10-22T06:27:17+5:302017-10-22T06:27:25+5:30
काही प्राचार्य, प्राध्यापक दुसºयांनी प्रसिद्ध केलेले साहित्य आपल्या नावावर प्रसिद्ध करतात. स्वत:चे संशोधन अथवा लेखन नसताना, स्वत:च्या नावावर असे साहित्य प्रसिद्ध करणे म्हणजे साहित्याची चोरी करण्यासारखे आहे.
मुंबई : काही प्राचार्य, प्राध्यापक दुसºयांनी प्रसिद्ध केलेले साहित्य आपल्या नावावर प्रसिद्ध करतात. स्वत:चे संशोधन अथवा लेखन नसताना, स्वत:च्या नावावर असे साहित्य प्रसिद्ध करणे म्हणजे साहित्याची चोरी करण्यासारखे आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई विद्यापीठाने तीन सदस्यांच्या समितीची नेमणूक केली आहे.
मुंबई विद्यापीठाकडे सिटीजन फोरमने एक तक्रार दाखल केली होती. यामध्ये एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी स्वत:च्या नावावर पुस्तकाची छपाई केली. पदोन्नतीसाठी अशा गैरमार्गाचा वापर होताना दिसतो. या प्रकारांमुळे अन्य व्यक्तींवर अन्याय होतो. हे टाळण्यासाठी विद्यापीठाने याकडे लक्ष देणे गरजचे आहे, असे मत फोरमचे राहुल आंबेकर यांनी व्यक्त केले.