ताडोबा जागतिक पर्यटन स्थळ करण्यासाठी समिती

By admin | Published: February 22, 2017 04:34 AM2017-02-22T04:34:42+5:302017-02-22T04:34:42+5:30

चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ करण्याच्या दृष्टीने

Committee to World Tourism in Tadoba | ताडोबा जागतिक पर्यटन स्थळ करण्यासाठी समिती

ताडोबा जागतिक पर्यटन स्थळ करण्यासाठी समिती

Next

मुंबई : चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ करण्याच्या दृष्टीने वनविभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात यावी व या समितीने या विषयाचा सखोल अभ्यास करून तीन आठवडयात अहवाल देण्याच्या सूचना वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
सहयाद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ताडोबा प्रकल्पाला जागतीक दर्जाचे पर्यटन स्थळ करण्याच्या दृष्टीने सॉलिमर इंटरनॅशनल या कंपनीच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले. यावेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक गरड, सहसचिव महाजन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांच्यासह वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सॉलिमर इंटरनॅशनल या कंपनीने याआधी अमेरिका, मेक्सीको, आफ्रीका, मलेशिया, सिंगापूर येथील वन्यजीव प्रकल्पांसाठी काम केले आहे. यात व्याघ्र संख्येत वाढ करणे, रोजगाराची संधी उपलब्ध करणे आदी बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे. निसर्ग समुपदेशन केंद्र, उपहारगृह, व्याघ्र तसेच वन्यजीवांबद्दल माहिती देणारे केंद्र, मनोरंजन व इतर सुविधा कशा उपलब्ध करण्यात येईल याबाबतचा विस्तृत उल्लेख या अहवालात आहेत. सदर अहवालाचा सखोल अभ्यास वनसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने करून येत्या तीन आठवडयात अहवाल सादर करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Committee to World Tourism in Tadoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.