सर्वसामान्यांना दणका,पेट्रोलवरील व्हॅटमध्ये दीड रुपयांनी वाढ

By Admin | Published: September 16, 2016 08:46 PM2016-09-16T20:46:36+5:302016-09-16T20:46:36+5:30

राज्य सरकारने विविध वस्तूंवरील मूल्यवर्धिक कर म्हणजे व्हॅटमध्ये दीड टक्का वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारने सर्वसामान्याना चांगलाच दणका

The common man, the VAT on gasoline, increased by one and a half rupees | सर्वसामान्यांना दणका,पेट्रोलवरील व्हॅटमध्ये दीड रुपयांनी वाढ

सर्वसामान्यांना दणका,पेट्रोलवरील व्हॅटमध्ये दीड रुपयांनी वाढ

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई,दि.16- राज्य सरकारने विविध वस्तूंवरील मूल्यवर्धिक कर म्हणजे व्हॅटमध्ये दीड टक्का वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारने सर्वसामान्याना चांगलाच दणका दिला आहे. या निर्णयामुळे सरकारला जवळपास ६०० कोटींचा अतिरिक्त महसूल व्हॅटमध्ये करण्यात आलेल्या या वाढीमुळे मिळणार आहे. 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे  डिझेलवरील व्हॅटमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. डिझेलवरील व्हॅट वाढवला तर शेजारील राज्यांची विक्री वाढेल या भितीने डिझेलवर व्हॅटवाढ केली नाही. जून महिन्यात पेट्रोलच्या दरांमध्ये घट झाली होती. मात्र आता व्हॅटमध्ये वाढविण्यात आल्यामुळे पेट्रोलच्या किमतीतही फरक पडणार आहे.

Web Title: The common man, the VAT on gasoline, increased by one and a half rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.