नाम फाऊंडेशनच्या मदतीसाठी सामुदायिक चित्राविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2016 08:08 PM2016-09-06T20:08:25+5:302016-09-06T20:08:25+5:30

शालिनी चंद्रा, नीता चंद्रा, प्रियंका जॉन व ऐश्वर्या जॉन या चार चित्रकर्तीनी साकारलेल्या लाइफ या शीर्षकांतर्गत नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये सध्या सुरू

Community discovery for the name foundation | नाम फाऊंडेशनच्या मदतीसाठी सामुदायिक चित्राविष्कार

नाम फाऊंडेशनच्या मदतीसाठी सामुदायिक चित्राविष्कार

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - जॉईस इंटिग्रिटी ट्रस्ट फाऊंडेशनद्वारा आयोजित शालिनी चंद्रा, नीता चंद्रा, प्रियंका जॉन व ऐश्वर्या जॉन या चार चित्रकर्तीनी साकारलेल्या लाइफ या शीर्षकांतर्गत नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये सध्या सुरू असून ते दि. ६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर, २०१६ हया कालावधीत ११ ते ७ या वेळेत रसिकांना व कलाप्रेमींना पाहायला मिळणार आहे.

सदर प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या चित्रांच्या विक्रीतुन जमणारी सर्व रक्कम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या नाना पाटेकर यांच्या ह्लनाम फाऊंडेशनह्व ला देण्यात येणार आहे. प्रस्तुत प्रदर्शनात सर्व चित्रकारांनी आपल्या शैलीत जीवनातील अनेक पैलू दाखविणारी चित्रे साकारली असून हया प्रदर्शनाचे आयोजन चित्रकार नीता चंद्रा यांनी केले आहे.



चित्रकर्ती प्रियांका जॉन व ऐश्वर्या जॉन हया दोघी ७ वी व ८ वीत शिकणार्‍या विद्यार्थिनी असून त्यांनी आपल्या चित्रांमधून मुख्यत: विविध पाळीव प्राणी, पक्षी, मानवी मनास त्यांच्याबद्दल वाटणारे प्रेम, मानवी जीवनातील अनेक अनुभव व वैशिष्ट्यपूर्ण भावस्पर्शी व्यक्तिविशेष साकारले आहेत.

सामाजिक कार्यासाठी आपलाही हातभार लागावा या हेतूने दोघींनी आपापली चित्रे प्रदर्शनात मांडली आहेत. चित्रकर्ती नीता चंद्रा यांनी आपल्या जीवनातील आजवरच्या अनेक अनुभवांवर आधारित चित्रे साकारली आहेत. त्यात मुख्यत: निसर्ग व त्यातील वैशिष्ट्यपूर्ण चमत्कृती तसेच मानवी आयुष्यातील अनेक अनुभव व उदात्त प्रेमभावना वगैरेचा समावेश आहे.

चित्रकर्ती शालिनी चंद्रा यांनी आपल्या चित्रांमधून राधा व कृष्ण ह्यांचे उदात्त प्रेम व ती दैवी संकल्पना योग्य अशा प्रतिकात्मक रूपात दाखविली आहे. तरुण स्त्रीच्या मनातील भाव त्यांनी चित्रांद्वारे हुबेहूब दाखविले आहेत. एकंदरीत नाम फाउंडेशनच्या सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आलेले हे वैशिष्ट्यपूर्ण कलाप्रदर्शन खरोखर सर्व कलारसिकांना एक वेगळा आनंद देईल.

Web Title: Community discovery for the name foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.