सामुदायिक शेती काळाची गरज
By admin | Published: November 3, 2016 02:05 AM2016-11-03T02:05:02+5:302016-11-03T02:05:02+5:30
मुंबई कोकण कृषी विद्यापीठ हे ज्ञानाचे सागर असून शेतकऱ्यांनी शेती हा व्यवसाय समजून कष्ट केल्यास शेतीतून समृद्धी मिळू शकते
मुंबई : मुंबई कोकण कृषी विद्यापीठ हे ज्ञानाचे सागर असून शेतकऱ्यांनी शेती हा व्यवसाय समजून कष्ट केल्यास शेतीतून समृद्धी मिळू शकते असा आत्मविश्वास कोकण कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ.जी.डी.जोशी यांनी व्यक्त केला. भात, नाचणी, वरी ही पारंपरिक पीके कमी होण्याचे कारण म्हणजे मनुष्यबळ कमी ही अडचण आहे. परंतु, मुंबईकर चाकरमान्यांनी संघटित होऊ आपापल्या गावात सामुदायिक शेती केल्यास लाभदायक ठरेल. सामुदायिक शेती ही काळाची गरज असल्याचे मत जोशी यांनी व्यक्त केले.
संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या विद्यमाने शामराव पेजे जन्मशताब्दी निमित्ताने ‘सहकारातून आधुनिक शेती’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समारंभाच्या अध्यक्षपदी पतपेढी अध्यक्ष अविनाश लाड होते. यावेळी ते म्हणाले की, पारंपरिक व्यवसाय शेती हा आहे, त्याच्या विकासाकरिता केवळ यंत्रणेवर अवलंबून न राहता आर्थिक गुणवत्तेनुसार कष्ट केले पाहिजे. आपल्या समस्या सोडविण्याची ताकद आपणच निर्माण करु शकतो.
।मुंबईकर चाकरमान्यांनी संघटित होऊ आपापल्या गावात सामुदायिक शेती केल्यास लाभदायक ठरेल. सामुदायिक शेती ही काळाची गरज असल्याचे मत जोशी यांनी
व्यक्त केले.