‘मुस्लिम’ बांधवांसाठी सामुदायिक विवाह सोहळा

By Admin | Published: May 18, 2016 01:29 AM2016-05-18T01:29:16+5:302016-05-18T01:29:16+5:30

केतकेश्वर मंगल कार्यालयामध्ये प्रथमच मुस्लिम समाजातील बांधवांसाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले.

Community marriage ceremony for 'Muslim' brothers | ‘मुस्लिम’ बांधवांसाठी सामुदायिक विवाह सोहळा

‘मुस्लिम’ बांधवांसाठी सामुदायिक विवाह सोहळा

googlenewsNext


वडापुरी : इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व मुस्लिम युवक संघटना यांच्या वतीने केतकेश्वर मंगल कार्यालयामध्ये प्रथमच मुस्लिम समाजातील बांधवांसाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले. या वेळी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांतील ९ मुस्लिम जोडप्यांचा विवाह पार पडला.
या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, अविनाश घोलप, मयूरसिंह पाटील, पद्मा भोसले, विलासराव वाघमोडे, अ‍ॅड. कृष्णाजी यादव, नानासाहेब शेंडे, लालासाहेब पवार, कांतिलाल झगडे, गणेश झगडे, भरत शहा, अशोक इजगुडे, कृष्णा ताटे, राहुल मखरे, प्रवीण माने, प्रशांत पाटील, भागवत भुजबळ, आबा शिंगाडे, अ‍ॅड. लक्ष्मण शिंगाडे, निवृत्ती गायकवाड, प्रताप पाटील, डी. एन. जगताप, अशोक शिंदे, भागवत गटकुळ, देवराज जाधव, संग्राम निंबाळकर, आबा वीर, शेखर पाटील, श्रीमंत ढोले, तुषार जाधव, तुषार खराडे उपस्थित होते.
आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, ‘‘चॅरिटेबल ट्रस्टने व मुस्लिम युवकांनी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. ते अतिशय कौतुकास्पद आहे. तसेच, नववधू-वरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’’
या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी तालुक्यातून ७ हजार लोक उपस्थित होते. इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व मुस्लिम युवक संघटना यांच्या वतीने या विवाह सोहळयासाठी आलेल्या लोकांना प्रशस्त शामियान्यात स्वतंत्र जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आयोजकांच्या वतीने नवदाम्पत्यांना संसारोपयोगी साहित्यवाटप करण्यात आले. या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टचे तालुक्यातील पदाधिकारी, सदस्य व मुस्लिम युवक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
>हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘सामुदायिक विवाह सोहळा ही सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये काळाची गरज आहे. इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व मुस्लिम युवक संघटना यांनी केलेला विवाह सोहळ्याचा उपक्रम चांगला आहे. तालुक्यातील सर्व मुस्लिम युवक एकत्र येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतला. याचा आदर्श सर्व समाजाने घ्यावा.’’

Web Title: Community marriage ceremony for 'Muslim' brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.