कंपनीकडे दीड कोटीच्या भरपाईचा दावा

By admin | Published: July 24, 2015 11:37 PM2015-07-24T23:37:20+5:302015-07-25T01:13:31+5:30

कापसाच्या बियाणांतील भेसळ सिध्द : कृषिधन, ग्रीन गोल्ड सीड्स, दफ्तरी सीड्सवर चौकशी समितीचा ठपका

The company claims compensation for one and a half crore | कंपनीकडे दीड कोटीच्या भरपाईचा दावा

कंपनीकडे दीड कोटीच्या भरपाईचा दावा

Next

सांगली : आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना ग्रीन गोल्ड सीड्स, कृषिधन सीड्स आणि दफ्तरी सीड्स कंपन्यांनी कापसाच्या भेसळयुक्त बियाणांचा पुरवठा करून फसवणूक केली आहे. त्यातून दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांचे दीडशे कोटींचे नुकसान झाले असून त्यांची भरपाई कंपन्यांनी तात्काळ द्यावी, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कंपन्यांकडे पाठविला आहे.
आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना बीटी कापसाचे बियाणे निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याच्या तक्रारी होत्या. त्यानंतर ‘लोकमत’ने त्याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. कृषी विद्यापीठाचे वैज्ञानिक आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी दिलीप कठमाळे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आर. एन. पाटील यांच्या पथकाने आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतील मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी केली. त्यानंतर तेथील नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्या अहवालानुसार आटपाडी तालुक्यातील निंबवडे आणि नेलकरंजी येथील आठ शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणांचा पुरवठा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये भीमराव पुजारी, शरद पाटील, कमलाबाई हिप्परकर (सर्व निंबवडे), राजाराम भोसले, रहिमान मुजावर, माणिक भोसले (सर्व नेलकरंजी) या शेतकऱ्यांचा समावेश आहे. ‘सुपरफायबर’ या वाणाचे बियाणे अनुवंशिक अशुध्द आढळले असून त्यामध्ये भेसळ दिसून आली आहे. लागवडीनंतर झाडाच्या उंचीमध्ये तफावत आहे. फांद्या व बोंडांच्या संख्येतही फरक दिसून आला आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या एका वाणाच्या बियाणामध्ये अन्य जातीचीही झाडे आढळून आली आहेत. कंपनीने भेसळयुक्त बियाणे शेतकऱ्यांना विकल्याचे त्यातून दिसत आहे. झाडांची सर्व बोंडे पक्व न होताच फुटल्याचे दिसून आले आहे. यामुळे बहुतांशी बोंडांमध्ये कापूस तयार झालेला नव्हता. कपाशीच्या इतर वाणांमध्ये अनुवंशिक शुध्दता आढळली. परंतु, या वाणामध्ये आकस्मिक मर आणि ‘पॅराविल्ट’चा प्रादुर्भाव आढळून आला. यामुळे झाडांची वाढ असमाधानकारक आढळली. कपाशीची बोंडे पक्वतेपूर्वीच उमलल्यामुळे कापसाची प्रत असमाधानकारक दिसून आली.
‘कविता गोल्ड’ या वाणाच्या लागवड क्षेत्रामध्ये बोंडांची संख्या अत्यल्प होती. दफ्तरी सीड्स (सेलू) उत्पादित कापूस बियाणे लागवड केलेल्या क्षेत्राच्या पाहणीमध्ये कापसाची प्रत असमाधानकारक दिसून आली.
कवठेमहांकाळ तालुक्यामधील शेतकऱ्यांच्याही कापूस बियाणाबद्दल तक्रारी होत्या. त्यानुसार अग्रण धुळगाव येथील अरविंद भोसले, दत्तू कनप, विजय भोसले, सुखदेव पवार, राजाराम पवार, विक्रमसिंग भोसले या शेतकऱ्यांच्या कापूस पिकाची पाहणी केली गेली. यामध्ये कृषिधन कंपनीच्या ‘सुपरफायबर’ या वाणामध्ये भेसळ दिसून आली आहे. सर्व झाडांची वाढ कमी-जास्त आढळली व बोंडे अपरिपक्व अवस्थेत फुटली आहेत. पाहणी केलेल्या शोवर कविता गोल्ड, हिरा दफ्तरी व बीटी ९९२ या वाणांवर आकस्मिक मर आहे. दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणांचा पुरवठा झाल्यामुळे त्यांचे दीड कोटीचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना संबंधित कंपन्यांनी ती भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपन्यांकडे अहवालाद्वारे केली आहे. तो अहवाल शुक्रवारी शासनाकडेही पाठविला आहे.चौकशी अधिकाऱ्यांच्या या अहवालावर कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. फौजदारी कारवाईसह त्यांच्याविरोधात न्यायालयात दावे ठोकण्यात येणार आहेत. बियाणे विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे, असा इशारा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

आमदारांकडून लक्षवेधी
आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणे पुरविल्याप्रश्नी खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. याप्रकरणी अधिकाऱ्यांकडून शासनाने माहिती मागविली असून त्यांनी ती माहिती शासनाकडे सादर केली आहे.शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा पुरवठा करून कंपन्यांनी उखळ पांढरे करून घेऊ नये, यासाठी जिल्ह्यातील अन्य लोकप्

चौकशी समितीला दिसून आलेल्या त्रुटी
सुपरफायबर या वाणाचे बियाणे अनुवंशिक अशुध्द आढळले असून त्या बियाणामध्ये भेसळ आढळून आली आहे.
कापसाच्या झाडाच्या उंचीमध्ये तफावत
उंची आणि बोंडाच्या संख्येतही मोठ्याप्रमाणात फरक दिसून येत आहे.
कापसाची बोंडे पक्व न होताच फुटली असून बहुतांशी कापूस तयार झाला नाही.
कापसाची प्रत असमाधानकारक असल्याचे स्पष्ट.ा्रतिनिधींनीही कंपन्यांच्या बोगस बियाणांबद्दल विधिमंडळात आवाज उठविण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: The company claims compensation for one and a half crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.