२०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी अपघात घटले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 09:18 AM2022-01-07T09:18:17+5:302022-01-07T09:18:26+5:30
२०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये अपघातात तीन टक्के घट, मृत्यूमध्ये ५ टक्के वाढ झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. २०१९ च्या तुलनेत २१ मध्ये जखमींची संख्या १२२ ने घटली. तर, ५५ मृत्यू वाढले आहेत.
- नितीन जगताप, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात वाढत्या वाहनांबरोबरच रस्ते अपघातही वाढले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२० मध्ये २६६३ अपघात झाले आहेत. यात ११८० जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये अपघातात तीन टक्के घट, मृत्यूमध्ये ५ टक्के वाढ झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. २०१९ च्या तुलनेत २१ मध्ये जखमींची संख्या १२२ ने घटली. तर, ५५ मृत्यू वाढले आहेत.
जळगाव जिल्ह्यात १०० % घट
जळगाव जिल्ह्यात २०१९ च्या तुलनेत १०० टक्के घट झाली आहे. २०१९ मध्ये ५९ अपघातामध्ये ३९ मृत्यू तर ४१ जखमी झाले होते. २०२१ मध्ये शून्य अपघाताची नोंद झाली आहे.
नागपूरमध्ये अपघात ८८% वाढ
नागपूर जिल्ह्यात २०१९ च्या तुलनेत ८८ टक्के वाढ झाली आहे. २०१९ मध्ये ६५ अपघातामध्ये ३६ मृत्यू तर ७७ जखमी झाले होते. २०२१ मध्ये १२२ अपघात झाले असून या अपघातात ४४ जणांनी आपला जीव गमावला आहे. तसेच १२९ जण जखमी झाले आहेत.
मुंबईत अपघातात ७५ % घट
मुंबई शहरात २०१९ च्या तुलनेत ७५ टक्के घट झाली आहे. २०१९ मध्ये २५९ अपघातामध्ये ५५ मृत्यू तर २५३ जखमी झाले होते. २०२१ मध्ये १८४ अपघात झाले असून या अपघातात ३१ जणांनी आपला जीव गमावला आहे. तसेच १७५ जण जखमी झाले आहेत.