मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई द्या!
By admin | Published: July 31, 2015 12:40 AM2015-07-31T00:40:29+5:302015-07-31T00:40:29+5:30
ठाकुर्ली रेल्वे स्थानकानजीक असलेल्या मातृकृपा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
कोल्हापूर : एलबीटी बंद झाल्याने मनपाच्या हिश्श्याचे अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगाराचेही वांदे होणार आहेत. त्यामुळे एलबीटीला सक्षम पर्याय द्या, अशी जोरदार मागणी महापौर वैशाली डकरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नगरसेवक व महापालिका कर्मचाऱ्यांनी मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना केली.
महापालिकेच्या मुख्य कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकाळी अकरा वाजता निघालेल्या मोर्चात तीन हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले. मोर्चानंतर महापालिकेचे कामकाज दिवसभर बंद ठेवण्यात आले होते.
एलबीटी रद्द झाल्याने राज्य शासनाकडून अनुदान कसे मिळणार, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक गणित चुकणार आहे. कर्मचाऱ्यांचा पगार व विकासकामे खोळंबल्याने ‘स्मार्ट सिटी योजने’तील सहभागही रखडणार आहे. दैनंदिन खर्च भागविणेही महापालिका प्रशासनास मुश्कील होणार असल्याने एलबीटीसारखे शाश्वत उत्पन्न देण्याची हमी राज्य शासनाने द्यावी, अशा मागणीचे निवेदन महापौर वैशाली डकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संगीता चौगले यांना दिले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या विठ्ठल रामजी चौकात नगरसेवक व कर्मचाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. यावेळी नगरसेवक राजेश लाटकर, जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले.
जकात किंवा एलबीटी हा महापालिकेच्या हक्काच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. ‘एलबीटी रद्द’चा परिणाम विकासकामांसह किरकोळ दुरुस्त्यांवरही होणार असल्याचे मत कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी व्यक्त केले.
उपमहापौर ज्योत्स्ना पवार-मेढे, नगरसेवक अजित पोवार, चंंद्रकांत घाटगे, शारंगधर देशमुख, मधुकर रामाणे, मुरलीधर जाधव, विजय चरापले, दिनकर आवळे, सुरेश सूर्यवंशी, विजय वणकुद्रे, आदींसह नगरसेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. (प्रतिनिधी)