रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना मिळणार 8 लाखांची नुकसान भरपाई
By admin | Published: July 5, 2017 08:51 PM2017-07-05T20:51:36+5:302017-07-05T20:54:03+5:30
रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना मिळणारी नुकसान भरपाई आता दुप्पट मिळणार आहे. रेल्वे प्रवास करताना अपघात झाल्यास रेल्वे प्रशासन 8 लाख रुपयांची
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 05 - रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना मिळणारी नुकसान भरपाई आता दुप्पट मिळणार आहे.
रेल्वे प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास प्रवाशांच्या कुटुंबीयांना आता रेल्वे प्रशासन 8 लाख रुपयांची मदत करणार आहे. तसेच, गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना देखील दिलासा मिळाला असून त्यांना 6 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
खासदार गणेश सिंग यांच्या नेतृत्वाखाली 13 जणांची संसदीय रेल्वे स्थायी समिती सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाची बुधवारी पाहणी केली. यावेळी भाजपचे किरीट सोमैय्या यांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते.
लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाची बुधवारी सायंकाळी पाहणी केली. पोलिसांचा सशस्त्र फौजफाटा पाहत नागरिकांमध्ये कुतुहुल निर्माण झाले होते. यावेळी उपनगरीय लोकल रेल्वे सेवांचे नियोजन, रेल्वे तिकीट यंत्रणेची सद्यस्थिती , रेल्वे स्थानकातील सुविधा यांची पाहणी समिति सदस्यांकडून करण्यात आली.