शेतकऱ्यांना ८९३ कोटींची नुकसान भरपाई
By admin | Published: March 2, 2017 05:32 AM2017-03-02T05:32:29+5:302017-03-02T05:32:29+5:30
राज्यातील २६ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ८३ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली
मुंबई : रब्बी हंगाम २०१५-१६ मधील आठ अधिसूचित पिकांकरिता राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत, राज्यातील २६ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ८३ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. लातूर विभागात सर्वाधिक सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ४०२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे.
रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी (बागायत व जिरायत), करडई, सूर्यफूल, गहू (बागायत व जिरायत), कांदा, उन्हाळी भुईमूग व उन्हाळी भात ही आठ पिके अधिसूचित करण्यात आली होती. राज्यातील ३४.२६ लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला होता. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ५६ कोटी ९१ लाख विमा हप्ता भरून २४.६० लाख हेक्टर क्षेत्राकरिता २८६५.४० कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते.
योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत शेतकरी विमा हप्ता वजा जाता, केंद्र शासनाचा हिस्सा ४०८.९२ कोटी रुपये व राज्य शासनाचा तेवढाचा हिस्सा अशी एकूण ८१७.८४ कोटी रुपये रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
>रब्बी हंगाम २०१५-१६ मधील भरपाईची रक्कम
नाशिक विभाग - ३२ लाख २२ हजार ९२३
पुणे विभाग - १०७ कोटी ३६ लाख ३२ हजार ९१८
कोल्हापूर विभाग - १० कोटी २८ लाख ५३ हजार ५४२
औरंगाबाद विभाग - ३४० कोटी ५७ लाख ५ हजार ४८०
लातूर विभाग - ४०२ कोटी ८४ लाख ८७ हजार १५३
अमरावती विभाग - ३१ कोटी ७६ लाख ८४ हजार ५३७
नागपूर विभाग - ६६ लाख ७६ हजार ६२७
रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी (बागायत व जिरायत), करडई, सूर्यफूल, गहू (बागायत व जिरायत), कांदा, उन्हाळी भुईमूग व उन्हाळी भात ही आठ पिके अधिसूचित करण्यात आली होती.