पाणीकपात रद्द करण्यावरून युतीत स्पर्धा
By Admin | Published: July 17, 2016 05:35 AM2016-07-17T05:35:24+5:302016-07-17T05:35:24+5:30
तलावांमध्ये जलसाठा दररोज वाढत असल्याने वर्षभराचा निम्मा साठा सुरक्षित झाला आहे़ त्यामुळे लवकरात लवकर पाणीकपात रद्द करून, त्याचे श्रेय खिशात घालण्यासाठी शिवसेना व भाजपामध्ये
मुंबई : तलावांमध्ये जलसाठा दररोज वाढत असल्याने वर्षभराचा निम्मा साठा सुरक्षित झाला आहे़ त्यामुळे लवकरात लवकर पाणीकपात रद्द करून, त्याचे श्रेय खिशात घालण्यासाठी शिवसेना व भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे़ पाणीकपात मागे घेण्यासाठी भाजपाने मागणी केल्यामुळे प्रशासनावर दबाव टाकून पाणीकपात सर्वात आधी रद्द करून घेण्यासाठी शिवसेनेची धावपळ सुरू झाली आहे़ गेल्या काही दिवसांमध्ये प्रमुख तलावांत सुमारे सात लाख दशलक्ष लीटर्स जलसाठा जमा झाला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत हा जलसाठा चार लाख दशलक्ष लीटर्सहून अधिक आहे़ त्यामुळे पाणीकपात रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे़ पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने जास्तीत जास्त विकास कामांचे श्रेय खिशात घालण्यासाठी युतीमध्ये चढाओढ सुरूआहे़ बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा सदस्याने पाणीकपात मागे घेण्याची मागणी परस्पर केली़ त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता असून, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव यांनी तत्काळ आयुक्तांना पत्र लिहून पाणीकपात मागे घेण्याची मागणी शनिवारी केली़ (प्रतिनिधी)पुरेसा पाणीसाठा- मुंबईत दररोज ३,७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा केला जातो़ आॅगस्ट २०१५ पासून २० टक्के पाणीकपात लागू आहे़ गेल्या वर्षी आजच्या तारखेला तलावांमध्ये दोन लाख ७८ हजार दशलक्ष लीटर जलसाठा होता़, या वर्षी आता सहा लाख ९८ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे़