लाचखोरांच्या विरोधात घरबसल्या तक्रार द्या

By Admin | Published: March 17, 2015 10:07 PM2015-03-17T22:07:57+5:302015-03-18T00:08:45+5:30

महाप्रबंधकांचे आवाहन : ‘लाचलुचपत’ खात्याने सुरू केली हेल्पलाईन, संकेतस्थळ सुरू

Complain against the bribe | लाचखोरांच्या विरोधात घरबसल्या तक्रार द्या

लाचखोरांच्या विरोधात घरबसल्या तक्रार द्या

googlenewsNext

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड झाली असली, तरी कामे करण्यासाठी लाच मागण्याचे प्रमाण कमी झालेले नाही, अशी वस्तुस्थिती असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणाऱ्याच्या विरोधात खात्याकडे तक्रार करण्यास ‘१०६४’ ही हेल्पलाईन तसेच ६६६.ंूुेंँं१ं२ँ३१ं.ल्ली३ हे संकेतस्थळ सुरू केले असून, घरी बसून तक्रार करता येते.
‘लाचलुचपत’ विभागाचे अधिकारी व कर्मचारी आता साध्या वेशात शासकीय कार्यालयात फिरून कामे न झालेल्या वा लाच मागितलेल्या लोकांची चौकशीही करीत आहेत. ‘लाचलुचपत’च्या तक्रारी बिनधास्त करा व भ्रष्टाचारमुक्त जिल्ह्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सोमवारी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे. यापूर्वी लाचलुचपत खात्याच्या लाचप्रकरणातील कारवाई पद्धतीत लाचखोर पुराव्याअभावी सुटत होते. तक्रार दाखल केल्यानंतर तपास व कारवाईस वेळ लागत होता. मात्र, आता कारवाईसाठीची उपाययोजना जलद करण्यात आली आहे. हुशार अधिकारी वा कर्मचारी आपल्या शिपायामार्फत व खासगी व्यक्तीमार्फत लाच स्वीकारत, अशीही प्रकरणे नवीन पद्धतीत लाचलुचपत विभागाने हाताळून तांत्रिक पुराव्याद्वारे संबंधितांवर कारवाई केल्या आहेत.  जागृत नागरिक व जागृत प्रशासन यांनी लाचलुचपत प्रतिबंधात्मक कारवाई होण्यासाठी किंबहुना शासकीय, निमशासकीय क्षेत्रातील लाच देणे-घेणे हा प्रकार थांबवून जनतेची व विकासाची कामे होण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे. लाच घेणाऱ्या व्यक्ती पकडल्यानंतर त्यांचे फोटो प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करणे ही त्यांना प्रथम शिक्षा ठरते. संपत्तीचा साठा केला तर त्याचीही माहिती बाहेर येते. त्यातून अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्थानिक पातळीवरच नव्हे, तर जिल्ह्यात, राज्यात बदनामी होते.  काही रकमेच्या लालसेपोटी अशी बदनामी होऊ नये, असे वाटत असेल, तर प्रामाणिकपणे अधिकाऱ्यांनी वा संबंधित कर्मचाऱ्यांनी जनतेची कामे करावीत. मात्र, जनतेची कामे संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार केल्यामुळे ती होणार नाहीत, अशी भीती नागरिकांनी बाळगू नये. शासकीय नियमानुसार लाच देऊन होणारे काम लाच न देताही होऊ शकते. म्हणून लाच देऊन काम करून घेऊ नका. लाच मागितली तर तक्रार करा. ते काम करून घेण्यासाठी संबंधित प्रशासनाला लाचलुचपत खात्याकडून सूचना दिल्या जातील, असेही दीक्षित यांनी स्पष्ट केल्याचे हुले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

मोफत हेल्पलाईन सुरू
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणाऱ्याविरोधात खात्याकडे तक्रार करण्यास ‘१०६४’ ही मोफत हेल्पलाईन सुरु केली आहे. तसेच ६६६.ंूुेंँं१ं२ँ३१ं.ल्ली३ हे संकेतस्थळही सुरू केले आहे.

Web Title: Complain against the bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.