खंडणीप्रकरणी महिला पत्रकाराला अटक, 1 लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार

By Admin | Published: June 7, 2017 08:26 PM2017-06-07T20:26:07+5:302017-06-07T20:26:07+5:30

माहिती अधिकारात माहिती मागवून बिल्डरला ब्लॅकमेल करून एक लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी विरार पोलिसांनी एका महिला पत्रकाराला अटक केली.

Complaint about the ransom, arrest of a woman journalist, Rs 1 lakh in ransom | खंडणीप्रकरणी महिला पत्रकाराला अटक, 1 लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार

खंडणीप्रकरणी महिला पत्रकाराला अटक, 1 लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार

googlenewsNext
>
ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 7 - माहिती अधिकारात माहिती मागवून बिल्डरला ब्लॅकमेल करून एक लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी विरार पोलिसांनी एका महिला पत्रकाराला अटक केली.
ज्योती तिवारी असे तिचे नाव असून ती टुडे 24 या चॅनेलची पत्रकार आहे. विरारमधील एका बिल्डरकडून दोन लाखाची खंडणी मागितली होती. व्यवहार एक लाखावर ठरल्यानंतर बिल्डरने पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा मोबाईल टॅपिंगवर ठेवला होता. मोबाईल संभाषणात तिने खंडणी मगितल्याचे निष्पन्न झाल्यावर विरार पोलीस ठाण्यात खंडणी मगितल्याची गुन्हा दाखल केला. आज पोलिसांनी तिवारीला अटक केली. 
तिवारीने वसई विरार महापालिकेत माहिती अधिकारात अनेक अर्ज केले आहेत. त्या माहितीच्या आधारे तिवारीने  अनधिकृत बांधकाम करणाऱ्या एका बिल्डरकडून खंडणी मागितली होती. अश्याच पद्धतीने आणखीन कुणाकडून खंडणी मागितली असावी. तसेच तिवारी सोबत कुणाचा सहभाग आहे का याचा तपास केला जात आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे यांनी दिली. 

Web Title: Complaint about the ransom, arrest of a woman journalist, Rs 1 lakh in ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.