अनुदान घेऊन शौचालय न बांधणाऱ्या ४६ लाभार्थ्यांची पोलिसांत तक्रार

By Admin | Published: December 27, 2016 06:50 PM2016-12-27T18:50:10+5:302016-12-27T18:50:10+5:30

कारंजा नगर परिषदेच्या वतीने ज्या लाभार्थ्यांनी शौचालय बांधकामाचे अनुदान प्राप्त होऊनही बांधकाम सुरू केले नाही

Complaint against 46 beneficiaries of non-toilets | अनुदान घेऊन शौचालय न बांधणाऱ्या ४६ लाभार्थ्यांची पोलिसांत तक्रार

अनुदान घेऊन शौचालय न बांधणाऱ्या ४६ लाभार्थ्यांची पोलिसांत तक्रार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड, दि. 27 - स्वच्छ भारत अभियानांतर्गत कारंजा नगर परिषदेच्या वतीने ज्या लाभार्थ्यांनी शौचालय बांधकामाचे अनुदान प्राप्त होऊनही बांधकाम सुरू केले नाही, अशा 46 लाभार्थी नागरिकांविरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

कारंजा शहर हे हागणदारीमुक्त होण्याकरिता कारंजा नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रयत्न करण्यात येत आहे. ज्या घरात शौचालय नाही अश्यांच्या घरी शौचालय बांधकाम करण्यात यावेत याकरिता जनजागृती करण्यात येत आहे. या करिता 3 डिसेंबर रोजी शहरातील नगर परिषद शाळा खासगी महाविद्यालय, कला पथक व पथनाट्याद्वारे स्वच्छता रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

कारंजा नगर परिषदेत शौचालय बांधकामाकरिता 3235 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 2452 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले. 1137 शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरित बांधकामे सरू आहेत. कारंजा नगर परिषदेच्या वतीने ज्या लाभार्थ्यांनी शौचालय बांधकामाचे अनुदान प्राप्त होऊनही बांधकाम सुरू केले नाही अश्या 46 लाभार्थी नागरिकांविरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली जात आहे. शौचालय असूनही बाहेर शौचास जाणा-या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांची मदत घेण्यात येत आहे.

Web Title: Complaint against 46 beneficiaries of non-toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.