अजित पवारांविरूद्ध न्यायालयात तक्रार
By admin | Published: May 15, 2014 05:44 AM2014-05-15T05:44:32+5:302014-05-15T05:45:48+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदानासाठी ग्रामस्थांना धमकावल्या प्रकरणी बारामतीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे संपत टकले यांनी तक्रार दाखल केली आहे.
बारामती : लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर मासाळवाडी (ता. बारामती) १६ एप्रिलला येथे बैठक घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदानासाठी ग्रामस्थांना धमकावल्या प्रकरणी बारामतीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे संपत टकले यांनी तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाने त्यांची तक्रार दाखल करून घेतली आहे. भाजपाचे दिलीप खैरे यांनीदेखील न्यायालयात तक्रार केली आहे. खैरे यांच्या तक्रारीअर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही. घटनात्मक अधिकाराचा गैरवापर पवार यांनी केला. आचारसंहितेचा भंग केला. या संदर्भात निवडणूक अधिकारी, निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणेकडे तक्रार दाखल करूनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे टकले व खैरे यांनी आयपीसी अंतर्गत तक्रार दाखल केली. या घटनेचे साक्षीदार असल्याचा दावा दोघांनी केला आहे. तक्रारदारांचे वकील अशिष गिरी यांनी सांगितले, की १५३ ए/१, १५३ बी, ३८३, १७१ सी, १६६, ५०३ प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची १५६ अंतर्गत चौकशीची मागणी केली. बारामतीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांकडे अॅड. आशिष गिरी, अॅड. नितीन भामे, अॅड. विक्रमसिंह पाटील यांनी तक्रारदारांच्या वतीने तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)