कणकवलीत भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
By admin | Published: February 6, 2017 01:57 AM2017-02-06T01:57:33+5:302017-02-06T01:57:33+5:30
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याच्या अगोदरच जिल्ह्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे
कणकवली : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याच्या अगोदरच जिल्ह्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते अनुपम कांबळी यांच्या घरी जावून धमकी दिल्याप्रकरणी रविवारी भाजपाच्या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. त्यावरुन काँग्रेसचे आ. नीतेश राणे आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पोलीस ठाण्यात त्यांची बाजू मांडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आपण या घटनेचा इन्कार करतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा पराभव दिसत असल्याने आमदार नीतेश राणे यांनी अनुपम कांबळी धमकी प्रकरणाचे कुभांड आपल्या विरोधात रचले आहे.
- प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग
जठार यांचा स्वीय सहाय्यक कार्यकर्त्यांना घेऊन त्यांच्या घरामध्ये घुसतात व महिलांना धमकावतात. त्यांचा शोध घेऊन आरोपींवर कडक कारवाई व्हायला हवी.
- नीतेश राणे, आमदार, काँग्रेस