बिल्डरविरुद्ध तक्रार आता घरबसल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:41 AM2018-07-25T00:41:37+5:302018-07-25T00:41:57+5:30

‘महारेरा’ची आॅनलाइन सेवा; वेबसाइटवर करा कागदपत्रे अपलोड

Complaint against the builder has now become a house | बिल्डरविरुद्ध तक्रार आता घरबसल्या

बिल्डरविरुद्ध तक्रार आता घरबसल्या

Next

मुंबई : ग्राहकाला बिल्डरविरोधात तक्रार करण्याचा मार्ग आता अतिशय सोपा झाला आहे. महारेराच्या वेबसाइटवर घरबसल्याच बिल्डरविरोधात तक्रार नोंदविता येणार आहे.
महारेरा कायद्याची अंमलबजावणी होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात महारेरासमोर अनेकांनी तक्रारी नोंदवल्या आणि महारेरामध्ये त्या सोडवण्यातही आल्या. मात्र यासाठी ग्राहकांना महारेरामध्ये फेऱ्या माराव्या लागत असत. मात्र आता वेबसाइटवर तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता तक्रारदाराला मुख्य कॉपी, तसेच बिल्डरला पाठवायची नोटीस महारेराच्या कार्यालयात आणून देण्याची गरज नाही. ही कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करायची आहेत. तक्रार संबंधित बिल्डरला महारेराच्या वेबसाइटवर तात्काळ दिसेल. महारेराकडून बिल्डरला नोटीस पाठवली जाईल. त्यानंतर तक्रारदार ग्राहक आणि बिल्डरला सुनावणीची तारीखही वेबसाईटवरच मिळेल.

महारेरा कायद्यानुसार ग्राहकाने बिल्डरच्या गृहनिर्माण प्रकल्पात गुंतवणूक केली असेल आणि घराचा ताबा मिळण्यास उशीर होत असेल, तर पाच हजार रुपये महारेरा कार्यालयात भरून तक्रार करता येते.
महारेरा कार्यालयातून ग्राहक, संबंधित बिल्डरांना सुनावणीसाठी तारीख दिल्यानंतर पुढच्या ६० दिवसांत त्या निकालाची सुनावणी
होणे बंधनकारक आहे. पण सुनावणीची तारीख जाहीर झाल्यानंतर तक्रारदाराला आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी
नाकीनऊ येत होते.
म्हणून आता महारेराकडून ही आॅनलाइन आणि तुलनेने सोपी पद्धत सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Complaint against the builder has now become a house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.